शरीराला गोड, आंबट, खारट, तुरट यांसारख्या पदार्थांची गरज असते. अनेकांना गोड पदार्थ खाण्यासाठी खूप आवडतात. जेवणामध्येही स्वीटडिशचा समावेश असतो. मात्र गोड पदार्थ कधी खावेत याविषयी माहिती नसते. गोड पदार्थ चुकीच्या वेळी खाल्ल्याने पचनसंस्थेवर विपरीत होतो. जाणून घ्या गोड पदार्थ जेवणात कधी खावेत –

गोड पदार्थ पचायला जड असतात. जेवणाच्या सुरुवातीलाच त्यांचे सेवन केल्याने त्यांचे पचन तर चांगलेच होतेच शिवाय पुढे आपण जे जेवण घेतो त्याचे प्रमाणही मर्यादेत राहते. जेवणाच्या शेवटी आणि त्यातही थंड करून गोड पदार्थ खाल्ल्यास जठराचे तापमान मी होऊन पचनसंस्थेवर परिणाम होतो. पचनक्रिया मंदावते. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे जेवण करताना गोड पदार्थ सुरुवातीला किंवा मधेमधे खावेत.