रात्रभर भिजवलेले मनुके सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त
भिजवलेले मनुके खाणे हे डोळ्यांसाठी चांगले असते. त्यामुळे डोळ्यांची कमजोरी दूर होण्यास मदत होते. मनुकामध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या दूर होतात.
केसांच्या समस्यांवर गुणकारी
केसांच्या समस्या दूर करण्यासाठी पाण्यात भिजवलेले मनुके खाल्ल्याने फरक जाणवतो. त्यासाठी तुम्ही रोज मनुके खा. यात आयर्न आणि व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे केस गळण्याची समस्या दूर होते. तसेच केस मजबूत बनतात. केसांची चमक वाढते.
पचनसंस्था सुधारते
रोज सकाळी रिकाम्या पोटी मनुका खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते . तसेच बद्धकोष्ठतेची, गॅसची समस्या दूर होण्यास मदत होते.
टीप– जास्त मनुके खाणे शरीरासाठी अपायकारक ठरते. त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. म्हणून जास्त प्रमाणात मनुके खाणे टाळा.