बहुगुणी असूनही मुळा हे एक दुर्लक्षित कंदमूळ आहे. मुळा चवीला तिखट असल्याने अनेक जण मुळ्याचा आहारात समावेश करणं टाळतात. मात्र मुळा खाणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. मात्र त्याचे सेवन नियमित आणि योग्य प्रमाणात करावे. जाणून घ्या मुळ्याचे शरीरासाठी होणारे फायदे

कावीळ आजारावर गुणकारी
कावीळ झाल्यास आहारात मुळ्याचा अवश्य समावेश करावा. यामुळे रक्त शुद्ध होते आणि रक्तात ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत होतो.

डायबेटिज रुग्णांसाठी लाभदायक
मुळा खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे मुळ्याचे सेवन करणे डायबेटिज रुग्णांसाठी लाभदायक आहे.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
मुळ्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. तसेच आहारात मुळ्याचा समावेश केला कॅलरी कमी होण्यासही मदत मिळते. परिणामी वजन कमी होण्यासही मदत होते.

बद्धकोष्ठता आजारावर गुणकारी
बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी रोज थोडा मुळा अवश्य खावा. मुळ्यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत होते.

किडनीस्टोन आजारावर गुणकारी
मुळ्यातील कॅल्शियम ऑक्सालेट हे किडनीस्टोन शरीरातून बाहेर काढण्यासाठी मदत करते.

ह्रदयाचे आरोग्य उत्तम राखतो
मुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी मुळा उपयोगी आहे.

अशक्तपणा कमी करण्यासाठी उपयोगी
अशक्तपणा जाणवत असेल तर मुळ्याचे सेवन करावे. मुळ्यामध्ये फॉस्फरस आणि आर्यन असतात. यांमुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते.

भूक वाढण्यास मदत होते
मुळ्याच्या रसामध्ये आल्याचा रस मिसळून पिल्यास भूक वाढण्यास मदत होते.