बहुगुणी आवळा अनेक आजारांवर गुणकारी आहे. आवळा हा ‘व्हिटॅमिन सी’चा खूप मोठा स्रोत आहे. आवळ्याचा विशेष गुणधर्म म्हणजे आवळा शिजवल्यानंतरही त्यातील ‘व्हिटॅमिन सी’ नष्ट होत नाही. आवळ्याची चव तुरट, गोड आणि आंबट असते. आवळ्यापासून आवळा कॅण्डी, मोरावळा, सुपारी, सरबत, लोणचं, आवळा पावडर यांसारखे पदार्थ बनवले जातात. रोज एक आवळ्याची फोड खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. जाणून घेऊयात नियमित आवळा खाण्याचे फायदे –
- पित्ताच्या त्रासावर आवळा अतिशय गुणकारी आहे. पित्ताचा त्रास असेल तर नियमितपणे आवळा कॅण्डी, आवळा सुपारी किंवा आवळा ज्यूस घ्यावा.
- अशक्तपणा, मधुमेह, पोटाचा त्रास असणाऱ्यांनी नियमित आवळा खावा.
- आवळ्यामुळे स्मरणशक्ती वाढते.
- शरीराची उष्णता कमी करण्यासाठी आवळा उपयोगी आहे.
- नियमितपणे आवळ्याचे सेवन केल्याने कॉलेस्टॉरॉल कमी तयार होते आणि ह्रदय निरोगी राहते.
- एक आवळा रोज खाल्ल्याने रक्तवाहिन्या मजबूत होतात.
- आवळ्याच्या नियमित सेवनाने रक्तातली साखरेची पातळी मर्यादेत राहते. त्यामुळे मधुमेहाचा त्रास थोड्या प्रमाणात कमी होतो.
- नेहमीच सर्दी पडसे होत असेल तर २ चमचे आवळ्याचा रस आणि २ चमचे मध रोज सकाळी नियमित एकत्र करून घेतल्यास अराम मिळतो.
- शरीर सुस्त राहत असेल, तर आवळ्याच्या सेवनाने रक्त संचारात गती येते. आवळ्यात अँटी ऑक्सीडंटस मोठ्या प्रमाणात असतात. आवळा शरीरातील पेशींचे आयुष्य वाढवण्याचे कार्य आणि फ्री रेडिकल कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे तारुण्य टिकून राहते.
- नियमित एक कच्चा आवळा खाल्ल्याने हिरड्या मजबूत होतात.