उन्हाळ्यात अचानक थकवा येतो. एनर्जी राहत नाही. मग अशावेळी काकडी खावी. काकडीचे नियमित सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते तसेच काकडी खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळून ताजेतवाने वाटते. जाणून घ्या काकडी खाण्याचे इतर फायदे –

उष्णतेचे विकार कमी होतात
काकडीमुळे शरीरातील उष्णता कमी होते. उन्हाळ्यात काकडीचे करणे अत्यंत लाभदायक असते.
हाताच्या तळव्यांची, तळपायांची आग होणे, शरीराचा दाह, तोंड येणे, लघवीला जळजळ होणे यांसारखे उष्णतेचे विकार नियमित काकडी खाल्ल्याने होत नाहीत.

वजन कमी होते
काकडीमध्ये असलेल्या कमी कॅलरीज आणि भरपूर पौष्टिक घटक असल्याने काकडी आपल्याला हायड्रेटेड रहायला आणि वजन कमी करण्यासाठी मदत करते.

त्वचा सुंदर बनते
काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सिलीकॉन असते ज्यामुळे त्वचा सुंदर, तुकतुकीत राहते.
डोळ्यांखाली असणारे डार्क सर्कल कमी करण्यासाठी काकडीच्या चकत्या डोळ्यांवर ठेवव्यात.

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते
काकडी खाल्ल्यामुळे ब्लड शुगर लेव्हल कमी राहते.

केसांसाठी उपयुक्त
काकडीचा ज्यूस नियमित पिल्याने केस गळती थांबते. तसेच केस मजबूत आणि घनदाट बनतात.

पचनसंस्था व्यवस्थित राहते
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ लवकर बाहेर टाकले जातात आणि काकडीतील सॉल्युबल फायबर्स पोट साफ करण्यासाठी मदत करतात.