माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : सध्या ब्राऊन ब्रेडसह ब्राऊन शुगरचे सेवन करण्याकडे अनेकांचा कल वाढू लागला आहे. भारतात मात्र याबाबत अद्याप फार माहिती नाही. ब्राऊन शुगर सेवन करण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. यामुळे तुम्हाला अनेक जीवनसत्व आणि खनिजे मिळतात. काय आहे ब्राऊन शुगर आपण जाणून घेऊयात… (brown sugar benefits)

ब्राऊन ब्रेड सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. उसाच्या रसातून मोलॅसिस हा घटक बाजूला काढून त्यानंतर ब्राऊन शुगर तयार करतात. ब्राऊन शुगरला नैसर्गिक रंग आणि सुगंध असतो. त्यामुळे त्यात अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे आपल्यासाठी फायदेशीर आहेत. ब्राऊन शुगर मासिक पाळीच्या वेदनांवरही उपायकारक आहे. शिवाय या शुगरमुळे त्वचेतील हायड्रेशन वाढण्यास मदत होते.

हे ही वाचा ः Diabetes : बदाम खा अन् मधुमेह नियंत्रित ठेवा, संशोधनात सिद्ध

ब्राऊन शुगर सेवन करण्याचे फायदे
– ब्राऊन शुगरमध्ये पोटॅशियम असल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत होते.
– ब्राऊन शुगर मिसळून आल्याचा चहा केल्यास शरीराला फायदा होतो.
– श्‍वसनाचा त्रासही या शुगरमुळे नियंत्रणात राहू शकतो.
– गर्भवती महिलांची ओटीपोट आणि पाठ दुखी यामुळे कमी होण्यास मदत होते.
– यातील व्हिटॅमिन बी 6, नियासिन आणि पॅन्टोथेनिक ऍसिडसारखे घटक त्वचा निरोगी ठेवतात.
– या शुगरमध्ये कॅलरीज कमी असते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
– ब्राऊन शुगरमधील अँटी-एलर्जिक गुणधर्म दम्याची लक्षणे कमी करतात.

हे ही वाचा ः  शांत झोपेसाठी रोज पिस्ता खा..! ताणतणाव, चिंता राहिलं कायमची दूर

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)