रोज सकाळी उठल्यानंतर एक सफरचंद खावे असं लहानपणापासून ऐकत आलेलो असतो. डॉक्टरही तोच सल्ला देतात. कारण रोज एक सफरचंद म्हणजे आजारांपासून दूर असं म्हटलं जातं. सफरचंद खाण्याचे अनेक फायदे आहेत. सफरचंद खाण्याने अनेक आजारांपासून दूर राहण्यात मदत होते.
सफरचंद खाण्याचे फायदे
– दररोज सफरचंद खाल्ले तर कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
– ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांनीही दररोज सफरचंद खावं. कारण सफरचंद खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच सफरचंद लठ्ठपणाविरोधी गुणधर्मांसारखे कार्य करते. त्यामुळे सफरचंद खाल्ल्याने लठ्ठपणाही कमी होतो.
– मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांसाठी तर सफरचंद खूप फायद्याचं आहे. कारण सफरचंदांमधील फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवून मधुमेह कमी करण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी दररोज एक सफरचंद खाल्लं पाहिजे.
– रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात सफरचंद मदत करतं. सफरचंदांमध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
– सफरचंदांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात आढळतात