सर्वांचा लाडका गणपती लवकरच विराजमान होत आहे. त्याच्या स्वागतासाठी सगळेच उत्सुक झाले आहेत. गणपतीच्या प्रसादासाठी अनेक ठिकाणी मोदक बनवले जातात. परंतु अनेकांना हे कसे बनवायचे माहित नसतं. आज आपण खव्याचे मोदक कसे बनवायचे हे जाणून घेऊ.

– सुरूवातीला हे साहित्य घ्या
खावा (मावा)- 400 ग्रॅम
साखर- 1/4 कप
इलायचीची पावडर -1/4 चमचा
केसर- चिमुटभर

– असे बनवा मोदक

सुरूवातीला पॅन घ्या.
पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये खवा आणि साखर टाका
त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिसळा
खवा आणि साखरेचं मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये केसर टाका
मग या मिश्रणाला घट्ट होईपर्यंत शिजवा.
त्यानंतर इलायचीची पावडर टाका आणि मिक्स करुन घ्या.
थोड्या वेळानंतर गॅस बंद करा..
मिश्रण थंड झाल्यानंतर त्याला मोदकाच्या साच्यामध्ये टाका अथवा हाताने मोदकाचा आकार द्या.