वयोमानानुसार चेहऱ्याला सुरकुत्या पडणे नैसर्गिक गोष्ट आहे. मात्र काहींना कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची अनेक कारणे असतात. काही घरगुती उपाय करून तुम्ही त्वचेवरील सुरकुत्या कमी करू शकता.

ऑलिव्ह ऑईल
रोज झोपण्यापूर्वी चेहरा, मान आणि हाताला ऑलिव्ह ऑईलने मसाज केल्यावरही त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

ऑलिव्ह ऑईल आणि दही
ऑलिव्ह ऑईल आणि दही एकत्रित मिक्स करून चेहरा आणि मानेवर लावा. वरच्या दिशेने चेहऱ्याला आणि मानेला थोडा मसाज करा. नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर सुकल्यानंतर १५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाका. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.

कोरफड
दिवसातून एकदा त्वचेला कोरफडीच्या गराने किंवा जेलने ५ मिनिट मसाज करावा. कोरफडीमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते तसेच त्वचाही मऊ आणि मॉईश्चर राहते.

चंदन
चेहरा आणि मानेला चंदनाचा लेप चेहऱ्याला लावावा. २० मिनिटांनंतर धुवून टाकावे. चंदनामुळे सुरकुत्या कमी होतातच शिवाय त्वचेचा रंगही उजळतो.

तांदळाचे पीठ आणि रोझ वॉटर
तांदळाचे पीठ आणि दोन चमचे रोझ वॉटर एकत्र करून मिश्रण बनवा. हे मिश्रण चेहरा आणि मानेला लावा. तांदळाचे पीठ त्वचा घट्ट करण्यासाठी तसेच त्वचेला स्क्रब करण्यासाठी उपयोगी आहे.

सवयी बदला
त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी पुरेशी आणि शांत झोप घेणे तसेच योग्य आहार घेणे आवश्यक आहे. फळे, हिरव्या भाज्या, दही यांसारख्या सकस गोष्टींचा आहारात समावेश करा. ताणतणाव कमी करा.