मलईचे दही घुसळताना त्यामध्ये फ्रिजमधील थंड गार पाणी घालावे म्हणजे लोणी पटकन सुटते.

मलईचे दही घुसळताना ब्लेंडरचा वापर करावा ३-४ मिनिटात लोणी वेगळे होते. हा ब्लेंडर आधी गरम पाण्यात बुडवून घ्यावा म्हणजे त्याला लोणी जास्त चिकटत नाही आणि साफ करतानाही गरम पाण्यात फिरवून घेतल्यावर पटकन स्वच्छ होतो.

दही घुसळून लोणी वेगळे झाल्यावर त्यामध्ये बर्फाचे खडे टाकून दहा ते पंधरा मिनिटं बाजूला ठेवून द्यावे त्यामुळे लोणी कडक होऊन वर जमा होते व ताक खाली राहते. हे लोणी काढताना हात गरम पाण्यात बुडवून घ्यावा म्हणजे लोणी हाताला चिकटत नाही.