जलजीरा
जलजीरा हा जीरा आणि पाणी वापरून बनवला जातो. विशेषत: उन्हाळ्यात पचनाची समस्या असलेल्या लोकांनी जलजिऱ्याचे सेवन अवश्य करावे.

चिंच सरबत
चवीला आंबट गोड असणाऱ्या चिंचेमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. उन्हाळ्यात चिंच आणि चिंचेचे सरबत यांचा अवश्य आहारात समावेश करावा.

गाजर ज्यूस
गाजरामध्ये पोटॅशियम, बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन ए आणि सी मोठ्या प्रमाणात आढळतात.त्यामुळे शरीराला थंडावा देण्याबरोबरच गाजर ज्यूस पिल्याने अनेक आजरांपासून संरक्षण देखील होते.

कलिंगडाचे सरबत
कलिंगडामध्ये अँटिऑक्सिडंट्स, क आणि ब 6 जीवनसत्व, झिंक, पोटॅशियम आणि खनिजांसह अनेक पोषक घटक आढळतात.तसेच कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. कलिंगडाचे सरबत पिल्याने तात्काळ ताजेतवाने वाटते.

लिंबू सरबत
उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू सरबत पाणी आवर्जून प्यावे. लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी चे प्रमान भरपूर असते, जे थकलेल्या शरीराला रिफ्रेश करते. तसेच लिंबू पाण्यामुळे इम्युनिटीही वाढते. मात्र लिंबू सरबत पाण्यात बर्फाचा कमी वापर केला पाहिजे.अन्यथा सर्दी आणि घशाचा त्रास होऊ शकतो.

उसाचा रस
उसाच्या रसात असलेले अँटी ऑक्सिडेंट आणि फोटोप्रोटेक्टिव्ह तत्व शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे उन्हाळ्यात वायरल इन्फेकशनपासून आपले रक्षण होते आणि आजार दूर राहतात.
उन्हाळ्यात अनेकांना डिहाइड्रेशनचा त्रास होतो. ज्यामुळे जेवण पचण्यास अडचण येते. अशावेळी उसाच्या रसाचे सेवन केल्यास डिहाइड्रेशनचा त्रास दूर होतो. त्यामुळे उन्हाळ्यात उसाचा रस अवश्य प्यावा.

नारळपाणी
नारळपाणी शरीराला ऊर्जा पुरवते. दररोज नारळपाणी पिल्याने डी हायड्रेशनचा त्रासही कमी होतो. याशिवाय रोगप्रतिकारशक्तीही वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात नारळपाणी देखील प्यावे.

संत्री ज्यूस
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. या फळांच्या सेवनामुळे शरीलाला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यास मदत करते. संत्री ज्यूस पिल्याने थकवा लवकर दूर होतो.