केसांच्या आरोग्यासाठी योग्य आहार आणि स्वच्छता गरजेची आहे. केसांचे पोषण होण्यासाठी आपल्या जेवणात पौष्टिक घटक समाविष्ट केले पाहिजेत. अन्नपदार्थांबरोबरच काही ज्यूस पण केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. जाणून घ्या केस निरोगी आणि घनदाट कोणते ज्यूस घ्यावेत –
1. गाजर ज्यूस (Carrot juice)
या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणामध्ये असते. गाजराच्या ज्यूसमुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. शारीरिक स्वास्थ्य सुधारते. तसेच केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावते. केस गळती कमी होऊन केस मजबूत आणि चमकदार बनतात.
2. कोथिंबीरीच्या पानांचा ज्यूस (Cilantro leaf juice)
कोथिंबीरीच्या पानांचा ज्यूस पिल्याने तसेच तसेच केसांना लावल्याने केसांचे आरोग्य सुधारते. कोथिंबीरीच्या पानांचा ज्यूस पिल्याने केस गळती कमी होऊन केसांची वाढ होण्यास मदत होते. कोथिंबीरीच्या पानांचा ज्यूस केसांना लावल्याने केसांत कोंडा होत नाही.
कोथिंबीरीच्या पानांचा ज्यूस कसा बनवावा
ताज्या कोथिंबीरीच्या पानांना पाण्याने धुवून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. पेस्ट गाळून घ्यावी.
हा ज्यूस पिण्यासाठीही वापरू शकता आणि केसांना लावण्यासाठी वापरू शकता. कोथिंबीरीच्या पानांचा ज्यूस केसांना लावल्यानंतर १ तासाने केस स्वच्छ धुवावेत.
काकडीचा ज्यूस (Cucumber juice)
शरीराला थंडावा आणि ऊर्जा देणारा काकडीचा ज्यूस निरोगी केसांसाठीही महत्वाचा आहे.
काकडीचा ज्यूस नियमित पिल्याने केस गळती थांबते. तसेच केस मजबूत आणि घनदाट बनतात.
कांद्याचा ज्यूस
कांद्याच्या ज्यूसचा वापर केसांना लावण्यासाठी तसेच पिण्यासाठीही करतात. नियमितपणे कांद्याचा ज्यूस प्यायल्यामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होते.
कांद्याचा रस केसांना लावून केसांची मसाज करावी आणि एक तासाने केस स्वच्छ धुवावेत.
कांद्यामुळे डोक्यामधील रक्त प्रवाह सुरळीतपणे चालू राहतो. केसांच्या मुळांपर्यंत रक्त पोहचते. तसेच केस गळती कमी होते, केसातील कोंडा कमी होतो, केस चमकदार बनतात.
टीप – ज्यूस नेहमी ताजेच प्यावेत. शिळे ज्यूस पिल्याने त्यातील पौष्टिक घटकांचा ऱ्हास तर होतोच शिवाय ते शरीराला अपायकारक बनतात.