पाणी शरीराला अत्यंत आवश्यक असणारा पदार्थ आहे. दररोज आठ ते दहा ग्लास पाणी प्यायलेच पाहिजे असे डॉक्टरही सांगतात. पाण्याने शरीराची तहान तर भागतेच परंतु त्वचाही सुंदर बनते. परंतु अनेकांना पाणी उभे राहून पिण्याची सवय असते. ही सवय अत्यंत धोकादायक आहे.

उभे राहून पाणी प्यायल्याने अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. चला तर मग जाणून घेऊया उभे राहून पाणी प्यायल्याने कोणते दुष्परिणाम होतात.

– उभे राहून पाणी प्यायल्याने शरीराला जे पाहिजे ते पोषण मिळत नाही. शिवाय ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. त्याचा परिणाम हृदयावर अन् फुप्फुसांवर होतो.

– तुम्हाला वाचून धक्का बसेल परंतु हे खरं आहे की उभे राहून पाणी प्यायल्याने तणाव वाढतो. तज्ञांनी याबद्दल माहिती दिली आहे.

– उभे राहून पाणी पिण्याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे गुडघेदुखीचा त्रास होण्याचा धोका असतो. उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघ्यांवर दाब पडतो, त्यामुळे सांधेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

– उभे राहून पाणी प्यायल्यास पचनाचे विविध विकार जडू शकतात. कारण ज्यावेळेस तुम्ही उभे राहून पाणी पिता तेव्हा ते अन्ननलिकेच्या स्थायूंवर दाब टाकते. त्यामुळे उभे राहून पाणी प्यायल्यास पचनप्रक्रियेत समस्या निर्माण होऊन पचनाचे विविध विकार जडू शकतात.

– उभे राहून पाणी प्यायल्याने तुमची तहान कधीच भागत नाही. त्यामुळे एका जागी शांत बसून आरामात पाणी प्यावे.

– उभे राहून पाणी प्यायल्याने किडनीच्या विकारांनाही सामोरे जावे लागू शकते.