शरीराला पाणी अत्यंत आवश्यक आहे. मात्र त्यासाठी पाणी योग्य प्रमाणात पिणं महत्वाचं आहे. जाणून घ्या कमी प्रमाणात पाणी पिल्याने आरोग्यावर होणारा परिणाम –

वजन

पाणी कमी पिल्याने वजन वाढू शकते.

अशक्तपणा येतो

पाणी कमी पिल्याने थकवा येतो. चक्कर येते.


डोकेदुखी ताणतणाव

पाणी कमी पिल्याने डोकेदुखी, तणाव यासारख्या समस्या निर्माण होतात.


चेहरा निस्तेज होतो

पाण्याच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. चमक नष्ट होते. चेहरा खराब होतो.


पचनक्रिया बिघडते,शरिरात चरबी साठते

अन्न पचण्यास अडथळे येतात. मेटाबॉलिजमची प्रक्रिया नीट होत नाही आणि शरीरात फॅट जमण्यास सुरुवात होते. शरीरात टॉक्सिन्सची मात्रा वाढते.

डोळ्यांच्या समस्या

कमी पाणी पिल्याने डोळेही शुष्क होतात. तसेच डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात.

रक्ताभिसरण
कमी प्रमाणात पाणी पिल्याने शरिरात रक्ताभिसरण योग्य होत नाही.

डिहायड्रेशन
पाणी कमी पिल्याने डिहायड्रेशनची समस्या निर्माण कमी होऊ शकते.