झुंबा हा प्रकार पाश्चिमात्य वर्कआऊटचा एक एरोबिक्स डान्स प्रकार आहे. परंतु सध्याच्या काळात यावर बॉलिवूडची गाणी लावून डान्स केला जातो. या प्रकारात तुमच्या सर्व शरीराचा चांगला व्यायाम होतो. तसेच झुंबा डान्स करण्याचे आपल्या शरीराला जबरदस्त फायदे आहेत.
झुंबा डान्स करण्याचे फायदे
तणाव कमी करण्यास मदत
तुम्हाला जेव्हा कधीही ताण-तणाव जाणवत असेल तर झुंबा वर्कआउट करून पाहा. त्यामुळे शरीराला फील-गुड हार्मोन सेरोटोनिन वाढवण्यास मदत करतो. याने मूड चांगला राहतो.
रक्तदाब सुधारतो
रक्तदाबाची समस्या असेल तर झुंबा वर्कआऊट करावा. झुंबा वर्कआऊट केल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि रक्तवाहिन्या निरोगी राहतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाह बरोबर होतो.
कॅलरीज बर्न होतात
झुंबा डान्स वर्कआऊट करत असताना तुमच्या शरीराचे सर्व स्नायू सक्रिय होतात आणि हृदयाचे ठोके वाढतात. जर ४० मिनिटांचा झुंबा वर्कआऊट केला तर ३७० कॅलरीज बर्न केल्या जाऊ शकतात.
स्नायूंची ताकद वाढते
झुंबा वर्कआउट करताना आपल्या संपूर्ण शरीराची हालचाल होते. स्नायूंना चांगला रक्तपुरवठाही होतो. त्यामुळे ते मजबूत होतात.