ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. मात्र अनेकांना ग्रीन टीच्या वापर कसा करावा विषयी योग्य माहिती नसते. तसेच ग्रीन टी चवीला कडू असल्याने मध, साखर किंवा गूळ मिसळतात. या पदार्थामुळे ग्रीन टी घेतल्याचाही उपयोग होत नाही. मध, साखर किंवा गूळ यांसारखे पदार्थ ग्रीन टी मध्ये मिसळल्याने त्यातील पोषक घटक कमी होतात. म्हणून ग्रीन टीमध्ये काहीही मिसळू नये.
ग्रीन टी वारंवार उकळू नका. एकदा ग्रीन टी बनवल्यानंतर लगेचच प्यावा.
बऱ्याचशा लोकांचा गैरसमज आहे की ग्रीन टी पिल्याने लगेच वजन कमी होते, चरबी वितळते. ग्रीन टी केवळ चयापचय क्रिया वाढवण्यास मदत करतो. त्यासोबत योग्य आहार घेतला आणि बाहेरचे खाणे टाळले व्यायाम केला तरच वजन कमी होऊ शकते.
ग्रीन टीच्या अधिक सेवनाने वजन झटपट कमी होते हाही एक मोठा गैरसमज आहे. ग्रीन टी अधिक प्रमाणात घेतल्याने वजन झटपट कमी होत नाही मात्र आरोग्य बिघडते. ग्रीन टीचे अधिक सेवन डोकेदुखी, पित्त, उलट्या, छातीत जळजळ होणे यांसारख्या आजारांना कारणीभूत ठरते. दिवसातून दोन वेळा ग्रीन टी घेतला तर चालतो. शक्यतो ग्रीन टी रिकाम्या पोटी घेऊ नये.