उपवास, व्रतवैकल्याची मोठी परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये निरंतर पाळली जाते. उपवास म्हणलं की आपल्या डोक्यात सर्वात आधी येते ती साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे हे खाऊन उपवास पाळायचा. परंतु काही लोकांना साबुदाण्याचे अधिक सेवन करणे नुकसानकारक ठरू शकते.

वजन अधिक असणे :
जर तुमचे वजन अधिक असेल किंवा तुम्ही वजन कमी करण्यासाठी वेट लॉस डायट करत असाल तर तुमच्यासाठी अधिक प्रमाणात सेवन करणे योग्य ठरू शकत नाही. सबुदाण्यामध्ये कॅलरीचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे वजन कमी नाही तर वाढते. वजन वाढल्याने तुम्हाला इतर समस्या अधिक जाणवू शकतात. जसे की मधुमेह, हृदय विकार, उच्च रक्तदाब सारख्या समस्या.

मधुमेहाची समस्या :
जर तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर साबुदाणा खाण्याचे प्रमाण कमी ठेवले पाहिजे. कारण त्यामध्ये कार्बोहायड्रेटची मात्र अधिक असून त्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. या पदार्थामध्ये स्टार्च अधिक असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांना स्टार्च फूड असलेले पांढरे तांदूळ, बटाटा, साबुदाणा खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

प्रोटिनची कमतरता :
जर तुमच्या शरीरात पहिल्यापासूनच प्रोटिनची कमतरता असेल तर साबुदाणा कमी खाल्ला पाहिजे. साबुदाण्यामध्ये प्रोटिनचे प्रमाण कमी असते. त्यामुळे साबुदाणा खाऊन प्रोटिनची कमतरता दूर करता येत नाही. आणि जास्त खाल्यास आरोग्याला अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

किडनीची समस्या :
अनेकांना किडनीची किंवा किडनी स्टोनची समस्या असते. अशा व्यक्तींनी साबुदाणा कमीच खाल्ला पाहिजे. यात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे किडनीच्या समस्या वाढू शकतात.

जर तुम्ही रोज साबुदाण्याचे सेवन करत असाल तर तुम्हाला अपचनाची समस्या येऊ शकते. जसे की, गॅस होणे, पोट दुखणे, पोट कडक होते अशा समस्यांचा यात समावेश होतो.

फिट राहायचयं मग पायऱ्या चढा आणि उतरा; जाणून घ्या फायदे

खूपच गुणकारी आहे ओवा; झटक्यात दूर होतील तुमच्या पोटाच्या समस्या!