सकाळचा नाश्ता शरीराच्या आरोग्यासाठी उत्तमच. परंतु तुम्ही नाश्त्याला काय खाता हे यावेळी जास्त परिणामकारक ठरते. अनेक लोक सकाळी नाश्ता करताना ब्रेड खातात. परंतु हा ब्रेड तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे का? मैद्याच्या ब्रेडचे जास्त सेवन केल्याने शरीराला ते हानिकारक ठरते. ते कसे, आपण पाहूयात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ब्रेड तयार करण्यासाठी प्रमुख घटक वापरला जातो तो म्हणजे मैदा. त्यात त्याचे जास्त सेवन करणे हानिकारक ठरू शकते. याशिवाय मैद्याच्या ब्रेडमध्ये पोषक तत्व फारच कमी असतात. त्यामुळे त्यातून शरीराला आरोग्यदायी काही मिळेल असे काहीही नाही. म्हणून मैद्याचा ब्रेड कमी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढ शकते :
तज्ज्ञांच्या मते, मैद्याच्या ब्रेडच्या अधिक सेवनामुळे मधुमेहाच्या जखमी वाढू शकतात. ब्रेड लगेच पचत असल्याने त्याचे शरीरात वेगाने साखरेत रुपांतर होत असते, त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. याशिवाय त्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे सारखेचे प्रमाण वेगाने वाढते. मधुमेह असलेल्या रुग्णांनी ब्राऊन ब्रेड आणि ग्रेन ब्रेडचे सेवन केल्यास उत्तम. परंतु तेही कमीच करावे.

वजन वाढणे :
ब्रेडचे अधिक सेवन केल्याने वजन वाढते. जे शरीरासाठी हानिकारक आहे. तसेच यातील कार्बोहायड्रेट शरीरात चरबीच्या स्वरुपात जमा होतात. तेच ब्रेड लवकरच पचत असल्याने लगेच भूख लागते आणि पुन्हा खाण्याची इच्छा होता. यामुळे शरीरातील कॅलरीचे प्रमाण वाढते, आणि त्यातून वजनही वाढते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते जास्त वजन आजारांना आमंत्रण ठरते.