वाढते ताण-तणाव, बदललेली जीवनशैली या सर्व गोष्टींशी जुळवून घेताना माणूस कधीकधी डिप्रेशनमध्ये जातो. मानसिक तणावा व्यतिरिक्त इतरही कारणांमुळे व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाण्याचा धोका असतो. त्यामुळे डिप्रेशन पासून लांब राहण्यासाठी काय उपाय करता येतील हे जाणून घ्या –
आवश्यक झोप घ्या
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक जण रात्री उशिरा झोपतात. त्यामुळे निद्रानाश, आळस, चिडचिडेपणा वाढीस लागतो. निद्रानाश, चिडचिडेपणा यामुळे डिप्रेशनचा त्रास होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नेहमीच पुरेशी झोप घेत चला.
व्यायाम करा
मन फ्रेश राहण्यासाठी माणसाला व्यायामाची आवश्यकता आहे. व्यायामामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. व्यायाम ही एक अँटिडिप्रेशन प्रक्रिया आहे. म्हणून नियमितपणे व्यायाम करत जा.
गोड पदार्थ कमी खा
अति गोड खाण्यामुळे मेंदूत रासायनिक बदल होतात व ताण वाढतो. त्यामुळे डिप्रेशन येण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात अधिक प्रमाणात गोड पदार्थ खाऊ नयेत.
मेडिटेशन करा
मेडिटेशनमुळे मनाला शांती मिळते. ताण-तणावासोबत जुळवून घेण्याची क्षमता वाढते. मेडिटेशनमुळे भावनांवर नियंत्रण ठेवता येते. डिप्रेशनपासून दूर राहण्यासाठी नियमितपणे मेडिटेशन करा.