संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने पोट साफ (Stomach Complaints)असणे व पोटाचे विकार (Stomach disorders) नसणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. पोटाच्या तक्रारी ही एक सर्वसामान्य समस्या बनली आहे. अनेकांना पोटाच्या समस्यांचा सामाना करावा लागत आहे. त्यामध्ये अपचनापासून ते भूक न लागणे अशा अनेक जठराशी संबंधित समस्या पहायला मिळतात. पोटाच्या तक्रारींमुळे निरोगी व्यक्तीलासुद्धा पोटदुखी किंवा पोट साफ न होणे अशा त्रासाला सामोरे जावे लागते. पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय (Home remedies) उपलब्ध आहेत. (Mazarogya)

लिंबू (lemon)
कपभर पाण्यात एक लिंबू व अर्धा चमचा बेकिंग सोडा टाका. सोडा पूर्णपणे मिक्स करा. हे पाणी पिल्याने गॅसपासून आराम मिळेल.

हर्बल टी (Herbal tea)
हर्बल टी गॅस प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी उपयोगी आहे. सकाळी व संध्याकाळी हर्बल टी घेतल्याने गॅस प्रॉब्लेम कमी होईल.

हळदीची पाने (Turmeric leaves)
हळदीच्या पानांची पेस्ट करून ही पेस्ट दुधात मिसळून घ्या. गॅस दूर करण्याची ही पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे.

भरपूर पाणी प्या (Drink plenty of water)
भरपूर पाणी पिल्याने पोटाशी संबंधित अनेक आजार दूर होऊ शकतात. दिवसभरात कमीत कमी ६ ते ८ ग्लास पाणी प्या.

आले / अद्रक (Ginger)
जेवणानंतर आल्याचा तुकडा खाल्ल्याने पोटात गॅस तयार होत नाही. थेट आले खाणे शक्य नसेल तर भाज्यांमध्ये आल्याचा समावेश करा.

बटाटे (Potatoes)
बटाट्याचा जेवणापूर्वी रस घ्या.