कामाचा व्याप वाढल्यामुळे तसेच कामाच्या ताणामुळे अनेकांना व्यायामासाठी वेळ नसतो. एका जागी अधिक वेळ बसल्याने मानदुखी, पाठदुखी, खांदेदुखी यांसरख्या अंगदुखीच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे या समस्या निर्माण होऊ नये म्हणून शक्य होईल तेव्हा शरीराची हालचाल करावी आणि ज्यावेळेस खुर्चीतून उठून हालचाल करणे शक्य नसेल त्यावेळी खालील स्ट्रेचिंग एक्सरसाईजच्या मदतीने तुम्ही खुर्चीत बसून देखील व्यायाम करू शकता, ज्यामुळे शरीराला नक्कीच आराम मिळतो.
चेअर बॅक स्ट्रेच
खुर्चीवर बसून दोन्ही हात मागे घ्या. आता पाठीचा कणा ताठ ठेवा आणि छाती पुढे घ्या. यामुळे तुमच्या पाठीचे स्नायू मोकळे होण्यास मदत होते. हा व्यायाम तुम्ही दिवसातून चार ते पाच वेळा करू शकता.
मानेचा स्ट्रेच
खुर्चीवर बसून आपली मान उजव्या हाताने डावीकडे न्या. नंतर डाव्या हाताचा वापर करून उजवीकडे न्या. त्यानंतर आता पुन्हा मान खाली घ्या नंतर वर करा. हा व्यायाम तुम्ही कितीही वेळा करू शकता. त्यामुळे तुमच्या मानेवरील ताण कमी होतो.
शोल्डरचा व्यायाम
अनेकांना खुर्चीत बसून लॅपटॉप आणि कम्प्युटरवर काम असतं. त्यामुळे खांदे आणि मान खूप ताणली जाते. त्यावर ताण येतो. यासाठी सोपा व्यायाम आहे. खुर्चीवर बसा आणि आता तुमचे खांदे कानापर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. हे तुम्ही चार पाच वेळा करा. ही स्ट्रेचिंग एक्सरसाईज केल्याने खूप आराम मिळतो.
लोअर बॅकिंग स्ट्रेच
ज्यावेळेस तुम्ही खुर्चीत बसलेले असता तेव्हा खाली वाकून पायाचे अंगठे धरण्याचा प्रयत्न करा. नंतर तुम्हाला शक्य होईल तेवढे वाकण्याचा प्रयत्न करा. हा व्यायाम तुम्ही दिवसातून 4-5 वेळा करू शकता.
कच्ची केळी खा आणि मिळवा अनेक आजारांपासून सुटका
डोळ्यांची काळजी घेण्यासाठी टिप्स