कमी वेळात आणि कमी कष्टात बनतात आणि चवीलाही चांगले लागतात म्हणून अनेक जण इन्स्टंट नूडल्स खाण्याला पसंती देतात. मात्र इन्स्टंट नूडल्स नेहमी खाल्ल्याने त्याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या इन्स्टंट नूडल्स अतिप्रमाणात खाण्याचे तोटे –

इन्स्टंट नूडल्समध्ये अनहेल्दी सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅट्स असतात. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, लठ्ठपणा आणि उच्च कोलेस्टेरॉलचा धोका वाढू शकतो.

इन्स्टंट नूडल्समध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. फायबर नसलेल्या आहारामुळे बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

इन्स्टंट नूडल्सरिफाईन्ड कार्बोहायड्रेट्स आणि अनहेल्दी फॅट्सने भरलेले असतात. इन्स्टंट नूडल्समध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर यांसारख्या आवश्यक पोषक घटकांची कमतरता असते.

इन्स्टंट नूडल्समध्ये हाय सोडियम असतात. यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयविकार, पक्षाघात आणि किडनीच्या समस्यांचा धोका वाढू शकतो.