चहा प्रेमी मसाला चहा पिण्याला बरीच पसंती देतात. मसाला चहाचे तसे बरेच फायदे आहेत. या चहामध्ये वापरण्यात येणारे मसाले आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. परंतु, या चहाचे अधिक प्रमाणात सेवन आपल्या आरोग्याला नुकसानकारक ठरु शकते. मसाला चहामध्ये दालचिनी, वेलची, तुळस, काळी मिरी, लवंग, आले असे मसाले टाकले जातात. त्यामुळे चहामधील उष्णता अधिक वाढते. म्हणून मसाला चहा जास्त पिल्यास शरीरावर त्याचे साईड इफेक्ट दिसू शकतात. चला तर जाणून घेऊयात मसाला चहा जास्त पिण्याच्या समस्या.
मसाला चहा जास्त पिण्याचे नुकसान :
- मसाला चहा जास्त पिल्याने पोट दुखणे, पेट फुगणे, पोटात आग होणे अशा समस्या जाणवू शकतात.
- मसाला चहामध्ये जास्त प्रमाणात कॅफिन असते, जे आरोग्यासाठी अपायकारक ठरते. जास्त प्रमाणात कॅफिन तणाव आणि चिंतेचे कारण ठरते.
- मसाला चहा जास्त पिल्याने रक्तदाबाच्याही समस्या उद्भवतात. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी मसाला चहाचे सेवन कमीच करावे किंवा टाळावे.
- अनेकदा जास्त मसाला चहाचे सेवन केल्याने छातीत जळजळ होते. तसेच तुम्ही रोज औषधे घेत असाल तर तुम्ही मसाला चहा पिणे टाळले पाहिजे.
- मसाला चहाचे अधिक प्रमाण डोळ्यात जळजळीचे कारण ठरू शकते. तसेच गर्भवती असलेल्या महिलांसाठी मसाला चहाच्या जास्त सेवनाने अॅलर्जीही होऊ शकते.