काही लोक माऊथ फ्रेशनर म्हणून तर काही लोक जॉ लाईन निमुळती व्हावी म्हणून च्युइंगगम चघळतात. मात्र जास्त प्रमाणात च्युइंगगम खाणे शरीरासाठी हानिकारक आहे. जाणून घ्या च्युइंगगम चघळण्याचे तोटे –

दातांसंबंधी समस्या
साखरयुक्त च्युइंगम खाल्ल्याने दातांसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे दात किडणे, पोकळी आणि हिरड्या दुखण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

आतड्यांच्या आरोग्याला हानी
च्युइंग गममध्ये वापरल्या जाणाऱ्या ॲडिटिव्हमुळे आतड्यांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. च्युइंगगममध्ये मेथॉल आणि सॉर्बिटॉल सारखे कृत्रिम गोड पदार्थ असतात जे आतड्यांना त्रास देतात आणि अतिसार होऊ शकत.

पचनक्रिया बिघडते
च्युइंगमचे जास्त सेवन केल्याने केल्याने पचनक्रिया बिघडते. त्यामुळे डायरियासारखे आजार होऊ शकतात.

डोकेदुखी, मायग्रेनची समस्या
च्युइंगमचे जास्त सेवन केल्याने डोकेदुखी होऊ शकते. च्युइंगगम सतत चघळल्याने स्नायूंवर ताण येतो आणि यामुळे पुन्हा मायग्रेनची समस्या उद्भवू शकते.