लिव्हर हे पचनसंस्थेचा महत्वाचा घटक आहे. ग्लुकोजची पातळी संतुलित करणे, ग्लुकोजचे ग्लायकोजेनमध्ये रूपांतर करणे, रक्ताच्या गुठळ्या व्यवस्थापित करणे आणि इतर विषारी पदार्थ काढून टाकणे, रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणे, रक्तातील जीवाणू साफ करणे यांसारखी महत्वाची कार्य लिव्हर करतो. धूम्रपान, मद्यपान, ताणतणाव, जंकफूड खाणे यांसारख्या गोष्टींमुळे लिव्हरवर ताण पडतो. यामुळे अनेकांना लिव्हरच्या संदर्भातील आजार उद्भवतात. लिव्हर व्यवस्थित काम करत नसल्यास थकवा, पोटदुखी, कावीळ, रक्तस्त्राव, सूज, किडनी निकामी होणे, उलट्या आणि मळमळ आणि निद्रानाश यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी धूम्रपान, मद्यपान करणे यांसारख्या गोष्टी टाळाव्यात. तसेच लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आहारात खालील पदार्थांचा समावेश करावा –

लिंबू
लिंबू लिव्हर निरोगी आणि मजबूत बनवू शकतो. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी तसेच भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. ते चयापचय वाढविण्यास मदत करतात.

जवस
जवसाच्या बियांमध्ये साइटोर्कोन्स-टीट्यूएंट्स आढळून येते. त्यामुळे हार्मोन्सला एकत्रित होण्यापासून रोखले जाते. यामुळे लिव्हरवर कमी दाब पडतो.

ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात जे लिव्हर डिटॉक्स करण्यास मदत करतात.

बीट
बीटमध्ये प्लांट-फ्लेव्होनॉइड्स आणि बीटा कॅरोटीन असतात. बीट लिव्हर आणि रक्त दोन्ही स्वच्छ करण्यात मदत करते.

गाजर
गाजरामध्ये ग्लूटाथिओन, बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि इतर पोषक घटक असतात. जे लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत करते.

लसूण आणि कांदा
लसूण आणि कांद्यामध्ये अनेक आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असतात, जे लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत करतात. कांद्यामध्ये सल्फर, अँटीबैक्टीरियल, अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे लिव्हर डिटॉक्स करण्यास मदत करतात.
लसूणमध्ये अँटीऑक्सीडेंट, अँटीमाइक्रोबियल तसेच प्रतिजैविक गुणधर्म असतात. हे शरीरातून हानिकारक विषारी पदार्थांचे बाहेर काम करून लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत करते.

हळद
रात्रीच्या वेळी झोपताना चिमूटभर हळद दुधामध्ये टाकून दूध प्यावे. त्यामुळे लिव्हर निरोगी राहते.