प्रत्येकाला आपले केस काळेभोर आणि घनदाट असावे असं वाटतं. परंतु अनेकांना केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. केवळ महिलाच नाही तर पुरुषही केसगळतीमुळे हैराण असतात. त्यामुळे अनेक पुरुषांना कमी वयातही टक्कलही पडते. याची अनेक कारणे असू शकतात. जसे की, केसांची काळजी न घेणे, तेल न लावणे, अनेक दिवस शाम्पू न करणे, हेअर प्रॉडक्टचा वापर करणे, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, औषधे अधिक सेवन ही आणि अशी अनेक कारणे.
अनेक पुरुष आहाराकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे पोषक तत्व कमी होतात. अधिक तेलकट पदार्थ, शर्करेचे पदार्थांचे अधिक सेवन, मद्यपान, मसालेदार जेवण, जंक फूड खाणे याचेही केसांवर परिणाम होतात, त्यामुळे केस कमी वयात गळू लागतात. त्यामुळे केस गळती रोखण्यासाठी पुरुषांनी काय खाणे टाळावे हे आपण पाहणार आहोत.
1. अधिक गोड पदार्थ :
जर तुमचे केस अनेक दिवसांपासून गळत असतील तर त्याचे कारण जास्त प्रमाणात गोड खाणे आहे. अनेकांना केक, मिठाई, चॉकलेट असे खूप गोड पदार्थ सतत खाण्याची सवय असते. गोड पदार्थ खाऊ नये असे नाही, मात्र त्याचे अरमान फार असावे. गॉड पदार्थ जास्त खाणे शारीरिक अपायकारक आहे. यात प्रॉसेस्ड शुगर असते. ज्यात पोषक तत्वांचे प्रमाण जवळपास नसते. त्यामुळे केसांचे नुकसान होते, आणि केस गळतीही होते.
2. मद्यपान करणे टाळा :
अनेकांना रोज मद्यपान करण्याची सवय असते. योग्य प्रमाणात मद्याचे सेवन शरीराला फार नुकसानकारक नसते. मात्र रोज मद्य सेवन केल्याने भूख कमी लागणे, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, डोकेदुखी, तणाव वाढणे, उच्च रक्तदाब हे आणि असे अनेक आजार वाढू लागतात. मद्य डिहाइड्रेशनचे कारण बनू शकते. त्यामुळे नंतर केस गळतीच्या समस्या जाणवू लागते.
3. डेरी प्रॉडक्ट कमी खा :
डेरी प्रॉडक्टमध्ये फॅटचे जास्त प्रमाण असते. ज्यामुळे शरीरातील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढते. असे झाल्यास केसांच्या समस्या जाणवू लागतात. पहिल्यांदा तुम्हाला कोंडा होणे आणि अन्य समस्या जाणवते, त्यानंतर केस गळण्याची समस्या जाणवू लागते. त्यामुळे डेरी प्रॉडक्ट खावे पण त्याचे प्रमाण नियंत्रित असावे.