शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे हाडे-सांधे दुखीची समस्या, मानसिक समस्या, अशक्तपणासारखे गंभीर आजार होऊ शकतात. शरीर जास्त काळ व्हिटॅमिन बी 12 साठवून ठेवू शकत नाही. त्यामुळे आहारात नियमितपणे व्हिटॅमिन बी 12 चा समावेश करावा. जाणून घ्या कोणत्या पदार्थांमधून व्हिटॅमिन बी 12 मिळते –

दूध
दूध हे परिपूर्ण अन्न आहे. दुधामध्ये व्हिटॅमिन बी-12 मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे नियमित दूध प्यावे.

तृणधान्य
तृणधान्यांमध्ये व्हिटॅमिन बी 12 असते. त्यामुळे आहारात तृणधान्यांचा समावेश करावा.

अंडी
अंडयामध्ये व्हिटॅमिन बी 12 असते. दररोज किमान 2 अंडी खाणे आवश्यक आहे.

ओट्स
नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करावा. ओट्स हे व्हिटॅमिन बी-12 चा चांगला स्रोत आहे.

चीज
चीजमध्येही व्हिटॅमिन बी-12 आढळते. त्यामुळे अधूनमधून आहारात चीजयुक्त पदार्थ खावेत.

मशरूम
मशरूम व्हिटॅमिन बी-12 चा चांगला स्रोत मानला जातो. त्यामुळे आहारात मशरूमचा समावेश करावा.

चिकन
चिकनमध्ये व्हिटॅमिन बी-12 आढळते. मात्र अति प्रमाणात चिकन खाऊ नये.