दिवसरात्र तुमचं धगधगणारं हृदय खरोखर अजूनही तरुण आहे का? तुम्हाला काय वाटतं? आपलं हृदय दिवसरात्र शरीरात रक्तभिसरण क्रिया न थांबता सुरू राहावी, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत रहावा यासाठी काम करत असतं. शरीर तंदुरुस्त बनवण्यासाठी आपण व्यायाम करतो. मात्र तुमचं हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही दिवसभरात काय करता…? हेल्थ एक्सचेंजमध्ये नुकत्याच छापून आलेल्या अहवालानुसार तुम्ही तुमच्या हृदयाचे विकार टाळण्यासाठी तुमच्या खानपानामध्ये काही बदल करू शकतात.

या अहवालानुसार हृदयाच्या समस्या कमी करण्यासाठी आपण काही शरीराला आवश्यक पदार्थांचे सेवन करू शकतो. ज्यात हेल्दी फॅट, फायबर, अँटी ऑक्सिडेंट, आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल असतील. हे सर्व घटक हृदयाला बळकट करण्याचे काम करतात. ज्यामुळे आरोग्य निरोगी राहते. चला तर जाऊन घेऊयात या गुणकारी पदार्थांबद्दल-

लसूण :
लसूण शरीरासाठी अत्यंत गुणकारी पदार्थ आहे, जो अनेक रोगांना बरा करतो. त्यातील औषधी गुण जसे की अँटी ऑक्सिडेंट, अँटीफंगल, व्हिटॅमिन सी, बी, कॅल्शिअम, सेलेनियम, माग्नीज आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी वाढण्यास मज्जाव करतात. त्यामुळे हृदयात आणि नसांमध्ये रक्ताच्या गाठी होत नाहीत. भाज्यांमध्ये यार आपण लसूण आवर्जून वापर करायला हवा. याशिवाय रोज सकाळी किमान तीन पाकळ्या अनुषीपोटी चावून खाव्यात.

बदाम :
बदाममध्ये न्यूट्रिएंट्सचे प्रमाज भरपूर असते. हे व्हिटॅमिन आणि खजिनांचे भांडार आहे, जे हृदयाला तंदुरुस्त ठेवतात. बदाममध्ये दोन आवश्यक घटक आहेत, ज्यामुळे हृदयविकार कमी होतात. बदाम खाल्याने कोलेस्ट्रॉल पातळीही नियंत्रणात राहते.

अक्रोड :
अक्रोडमध्ये ओमेगा 3 एस या शरीराला गुणकारक असलेल्या फॅटचे प्रमाण भरपूर असते. दिवसभरात 3-4 अक्रोड खाल्यास आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते आणि त्यामुळे हृदय आणि नसांमध्ये होणाऱ्या रक्ताच्या गाठी होऊ देत नाही.

अवोकडो :
अवोकडोचे सेवन आपण जवळपास करताच नाही; परंतु हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. मोनो सॅच्युरिटेड फॅट यात मोठ्या प्रमाणात असतात. ते कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासह हृदयविकाराचा धोका कमी करतात. यात पोटॅशियमदेखील असते, जे हृदयाला आवश्यक पोषक तत्व पुरवतात.

ब्रोकोली आणि गाजर :
ब्रोकोलीसह कोबी, ब्रसेल्स स्प्राउट, फ्लॉवर या भाज्या देखील हृदयाच्या स्वास्थासाठी आवश्यक असतात. या भाज्यांमध्ये मोठया प्रमाणात फायबर, पोटॅशियम, अँटी ऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे हृदयरोग नियंत्रणात राहतात. तसेच गाजरातदेखील भरपूर अँटी ऑक्सिडेंटची मात्रा असते. तसेच यातील पोटॅशियम ब्लड प्रेशरला नियंत्रणात ठेवा.

खुर्चीत तासनतास बसल्याने अंग दुखतंय, मग या स्ट्रेचिंगचे एक्सरसाईज कराचं

केस गळती टाळण्यासाठी घरगुती उपाय