कोरोनामुळे आरोग्य किती महत्वाचं आहे, हे आता सर्वांनाच माहिती झालं आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढवणं आवश्यक आहे. त्यातच आता आरोग्य मंत्रालयाने नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खाद्यपदार्थांची यादी जाहीर केली. तुमच्या आहारातही या पदार्थांचा समावेश करा.
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय खावे?
* कोविड रुग्णांचे मुख्य लक्ष स्नायू, रोग प्रतिकारशक्ती आणि ऊर्जेची पातळी वाढवणाऱ्या खाद्यपदार्थांवर असली पाहिजे.
* नाचणी, ओट्स आणि अमरनाथ सारख्या संपूर्ण धान्यांचा वापर आहारात करा.
* कोंबडीचे मांस, मासे, अंडी, सोया, नट, चीज यासारख्या प्रथिनांचा चांगला स्त्रोत असलेले खाद्यपदार्थ खा.
* बदाम, अक्रोड, ऑलिव्ह ऑईल, मोहरी तेल यासारख्या गोष्टींचा वापर आहारात करा.
* नियमित शारीरिक हालचाल जसे की योग आणि प्राणायाम करणे आवश्यक आहे.
* चिंतेपासून मुक्त होण्यासाठी कमी प्रमाणात डार्क चॉकलेट खा, ज्यामध्ये कमीतकमी 70 टक्के कोको असेल.
* रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हळदीचे दूध दिवसातून एकदा प्या.
* व्हिटॅमिन्ससाठी वेगवेगळ्या फळांचा तसेच भाज्यांचा आहारामध्ये समावेश करा.
*रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दही मिसळलेलं दूध घ्या.