डायबिटीजचा कोणताही इलाज नसला तरीही, डायबिटीजवर उपचार आणि नियंत्रण केले जाऊ शकते. डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करणे आवश्यक आहे व त्यासाठी काही पथ्ये पाळणे व योग्य आहार घेणे आवश्यक आहे. डायबिटीज असणाऱ्या व्यक्तीचा आहार संतुलित असणे अत्यंत गरजेचे आहे. जाणून घ्या डायबिटीजच्या रुग्णांनी कोणता आहार घ्यावा –

पेये
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी मेथीच्या दाण्याचे पाणी अथवा साखरेशिवाय लिंबू पाणी दररोज प्यावे. यामुळे डायबिटीज आटोक्यात राहण्यास मदत मिळते.
दिवसभर किमान आठ ते दहा ग्लास पाणी नक्की प्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ आपल्या मूत्राद्वारे बाहेर जाण्यास मदत मिळते.
नियमितपणे नारळपाणी प्यावे.

हिरव्या भाज्या
डायबिटीजच्या रुग्णांनी हिरव्या भाज्यांमध्ये पालक, मटर, सिमला मिरची, कारले, कच्चा कांदा, वांगी या सर्व भाज्यांचा समावेश करून घ्यावा. हिरव्या भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात व्हिटामिन्स आणि मिनरल्सचा समावेश असतो.
डायबिटीजच्या रुग्णांनी स्टार्च म्हणजे पिष्टमय पदार्थ कमी असणार्‍या भाज्या प्राधान्याने खाल्ल्या पाहिजेत. त्यात प्रामुख्याने पालक आणि मोड आलेली हिरवी कडधान्ये यांचा समावेश होतो. हे मोड आलेले कडधान्य आहारात मिसळून खाणे जास्त श्रेयस्कर असते.

फळे
डायबिटीजच्या रुग्णांनी कच्ची केळे, लीची, डाळिंब, पेरू, पपई, जांभूळ एवाकाडो या फळांचे नियमित सेवन करावे. यामुळे शरीरातील साखर वाढत नाही.
चिकू, आंबा या फळांमध्ये जास्त साखर नैसर्गिकरित्या असते. त्याामुळे अशी फळं खाणे शक्यतो टाळा.

ड्रायफ्रूट्स
रोज किमान दोन बदाम, अक्रोड खावेत. अन्य गोड सुकामेवा खाणे टाळावे.

दुधाचे पदार्थ
दही आणि दुधामुळे शरीरातील साखरेची पातळी व्यवस्थित राखण्यास मदत मिळते. तसेच पनीर देखील खाऊ शकता.

नॉनव्हेज
डायबिटीज झालेले चरबीचे प्रमाण कमी असणारे मांसाहरी पदार्थ खाऊ शकतात. अंड्याचा पांढरा भाग, चिकन उकडून आणि मासे शिजवून शक्यतो खावे. तळून अथवा मसालायुक्त, पचनास जड असलेला मांसाहार करून खाऊ नये.

वेळेवर जेवण करा
डायबिटीजच्या रुग्णांसाठी जेवणाची वेळ खूप महत्वाची ठरते, कारण काय आणि कधी खातो, यावर शरीरात साखरेचे शोषण अवलंबून असते. जर डायबिटीजच्या रुग्णाने दररोज एकाच वेळी समान प्रमाणात अन्न खाल्ले तर रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते.
डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी रात्री हलका आहार घ्यावा. रात्री उशिरा अतिरिक्त कॅलरी खाल्ल्याने वजन वाढतं.

( टीप– सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. उपचारापूर्वी वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. )