रक्त शुद्ध असेल तर आपले शारीरिक आरोग्य चांगले राहते. रक्त शुद्ध असेल तर मूत्रपिंड, हृदय, यकृत, फुफ्फुस यांचे कार्य सुरळीत चालते तसेच त्वचाही निरोगी राहते. त्यामुळे रक्त शुद्ध ठेवण्यास मदत करणाऱ्या खालील पदार्थांचा आहारात समावेश अवश्य करा.
पाणी
पाणी शरीरातील सर्व हानिकारक रसायने आणि विषारी पदार्थ बाहेर टाकते. त्यामुळे रक्त शुद्धीसाठी अधिक प्रमाणात पाण्याचे सेवन करावे.
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्यांमध्ये आवश्यक पोषक घटक आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. ते रक्त शुद्ध ठेवण्यास मदत करतात. हिरव्या पालेभाज्या रक्तातील लोहाचेही प्रमाण वाढवतात. तसेच ब्लड डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेस देखील चालना देतात.
फळे
टोमॅटो, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, सफरचंद, मनुका, नाशपाती आणि पेरु यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
गूळ
गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. गुळाचे नियमित सेवन केल्याने रक्त शुद्ध राहण्यास मदत होते.
हळद
हळदीचे पाणी पिल्याने रक्त गोठत नाही आणि रक्त साफ होण्यासही मदत होते. त्याशिवाय रक्ताच्या धमन्यांमध्येही रक्त साठत नाही. हळद विषारी गोष्टींपासून यकृताचे रक्षण करते आणि खराब यकृताच्या पेशी पुन्हा नीट होण्यास मदत होते.