प्रत्येक ब्लडग्रुपचं (Blood group) विशिष्ट स्वरूप असतं. त्यामुळे रक्तगटानुसार आहाराचे स्वरूप (Diet) देखील ठरते. ब्लड ग्रुपनुसार आहार घेणे आरोग्यास लाभदायक आहे. जाणून घ्या ब्लड ग्रुपनुसार आहार कसा घ्यावा याविषयी माहिती –

ए रक्तगट (A Blood group)
ए रक्तगट असणाऱ्या व्यक्तींनी हिरव्या पालेभाज्या, मासे, डाळी, ऑलिव्ह ऑईल, डेअरी उत्पादनं, मका, टोफू, सीफूड यांचा आहारात समावेश करावा. या रक्तगटातील व्यक्तींची रोगप्रतिकारक यंत्रणा संवेदनशील असते. त्यामुळे मांसाहारी पदार्थ कमी प्रमाणात खावेत.

बी रक्तगट ( B Blood group)
बी रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना सर्वसमावेशक आहार चालतो, त्यांना आहारातून कोणत्याही पदार्थाचे पथ्य पाळण्याची आवश्यकता नाही. या रक्तगटातील व्यक्तींनी दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, हिरव्या पाल्याभाज्या, फळ, मासे, मटण आणि चिकन या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

एबी रक्तगट (AB Blood group)
एबी रक्तगट असणाऱ्या व्यक्तींनी ब्लड ग्रुपमधील व्यक्तींनी संतुलित आहार घ्या. या व्यक्तींनी मांसाहार कमी प्रमाणात करावा तर फळ, दूध, दुग्धजन्य पदार्थ, लोणी आणि भाज्यांचे अधिक प्रमाणात सेवन करावे.

ओ रक्तगट (O Blood group)
ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींनी डाळी, मांस, मासे, बीन्स फळे यांचा आहारात समावेश करावा.

( टीप : येथे दिलेली सामान्य माहितीवर आधारित आहे. माझं आरोग्य याची पुष्टी करत नाही. आपणास क्तदाब किंवा मधुमेह यांसारखे आजार असल्यास आहारासाठी वैद्यकीय सल्ला घ्या. )