मध
मध्यमाश्यांनी बनवलेले मध मुळातच टिकाऊ असते. मध जर व्यवस्थित साठवले तर ते अनेक वर्ष टिकते. मात्र हे मध नैसर्गिकच हवे. आजकाल बाजारात मिळणारे मध हे बऱ्याच अंशी भेसळयुक्त असतात. त्यामुळे ती जास्त दिवस टिकू शकत नाहीत.

तांदूळ
तांदूळ हा असा पदार्थ आहे जो कित्येक काळ ठेवला तरीही खराब होत नाही. तांदुळ जर बंद डब्यामध्ये योग्य तापमानात ठेवला तर अनेक वर्ष खराब होत नाही. तांदूळ अधिक काळ टिकवायचे असतील तर उन्हात कधीही वळत घालू नये. साळीपासून तांदूळ बनत असतात तेव्हाच ते उन्हात तापवलेले असतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा तांदूळ उन्हात वळत घातले तर ते खराब होतात.

मिल्क पावडर
दुधावर प्रक्रिया करून मिल्क पावडर बनवली जाते. दुधापासून तयार केलेली मिल्क पावडर ही बराच काळ ठेवली तरी राहते. मिल्क पावडर देखील साठवताना हवाबंद डब्यात ठेवावी. फ्रिजमध्ये ठेवू नये.

 

राजमा, सोयाबीन, सुके मटार
राजमा, सोयाबीन, सुके मटार हे बराच काळासाठी टिकतात आणि लवकर खराब होत नाहीत. हे पदार्थ फ्रिजमध्ये कधीही ठेवू नयेत.


.