तणाव कमी होतो, मेंदूची कार्यक्षमता सुधारते
डार्क जलद ऊर्जा देते. डार्क चॉकलेट मेंदूची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास आणि सुधारण्यास देखील उपयुक्त आहे. चॉकलेटमध्ये विशिष्ट प्रमाणात कॅफीन आणि थियोब्रोमाइन असते. यामुळे ऊर्जा वेगाने वाढते. त्यामुळे रक्तदाब कमी असेल, उदास वाटत असेल, सुस्ती आली असेल तेव्हा डार्क चॉकलेट अवश्य खावे. डार्क चॉकलेट खाण्याने तणाव कमी होतो.
उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत
डार्क चॉकलेटमधील काही घटक उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्यामुळे नियमितपणे डार्क चॉकलेट खाल्ल्याने व्यक्तीला हृदयरोग होण्याची शक्यता कमी होते.
इन्सुलिनचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत करते
डार्क चॉकलेटमध्ये असलेले फ्लावेनॉईडस् रक्तातील साखर कमी करण्यास सहायक असतात. शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी डार्क चॉकलेट उपयुक्त आहे.
सूज आणि दुखणे कमी होण्यास मदत
डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवोनोइड्स आणि कोको असते. हे ‘अँटिऑक्सिडंट्स’ म्हणून काम करतात. यामुळे सूज आणि दुखणे कमी होण्यास मदत होते.यामुळे संवेदनक्षमता सुधारते.
मूड सुधारतो
डार्क चॉकलेटमध्ये सेरोटोनिन, न्यूरोट्रांसमीटर आणि ट्रिप्टोफॅन ही मानसिक आनंद देणारी रसायने असतात. त्यामुळे मूड सुधारतो.
टीप – डार्क चॉकलेटचे अतिसेवन आरोग्यास घातक आहेत. त्यामुळे डार्क चोकलेटचे सेवन योग्य प्रमाणातच करावे.