मागील काही वर्षांपासून आपली बिघडलेली जीवनशैली, तणाव, अपायकारक पदार्थ आणि कमी झोप यामुळे लठ्ठपणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. या लठ्ठपणामुळे अनेकांना अनेक आजारही जडतात. त्यामुळे अनेकजण लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगवेगळे उपायही करतात. परंतु आपल्या घरातील एक असा पदार्थ जो तुमचे वजन सहज घटवू शकतो, तो म्हणजे दही.
अनेक आरोग्य तज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी दही खाण्याचा सल्ला देतात. दही आपले वजन कमी करण्यासाठी कसे उपयुक्त आहे हे आपण पाहणार आहोत.
1. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी योग्य व्यायाम आणि योग्य आहार दोन्ही गरजेचा आहे. आपल्या आहारात बदल केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आहारात दह्याचा समावेश करावा. आहारात दह्याचा समावेश केल्यास लठ्ठपणा घटण्यास मदत मिळते.
2. दह्यात बऱ्याच प्रमाणात कॅल्शिअम असते. जे बॉडी मास्क इंडेक्स नियंत्रणात ठेवते. त्यामुळे दही योग्य प्रमाणात खाल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
3. दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्बोदके आणि प्रोटीन असते. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी ते एक उत्तम फूड आहे. दह्यातील प्रोटीन लिन मसल मास्क कायम ठेण्यास मदत करतात.
4. तज्ञांच्या मते, ज्या लोकांचे मेटाबॉलिज्म भरपूर असते. त्यांना वजन कमी करण्यास मदत मिळते. दह्यात प्रो- बायोटिक्स असते जे पचन क्षमता वाढवतात. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.
असे खा दही :
तुम्ही रोज दुपारी किंवा रात्री जेवणामध्ये एक वाटी दह्याचा समावेश करू शकतात. याशिवाय स्मूदी म्हणूनही तुम्ही दह्याचा समावेश नाश्त्यामध्ये करू शकतात. वजन कमी करण्यासाठी ताक, लस्सी देखील फायदेशीर ठरते.