कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेच्या प्रक्रियेला वेग दिला जात आहे. सध्या 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जात आहे. त्यातच सर्वांनी कोरोना लस घ्यावी यासाठी विविध प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे. अशातच सरकारने एक स्पर्धा सुरू केली आहे. सरकारतर्फे एप्रिलमध्येच ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती. सरकारने या मोहिमेला प्रोत्साहन देण्याचा पुन्हा प्रयत्न केला आहे. यासाठी तुम्हाला तुमचा वा कुटुंबाचा कोरोना लस घेतल्याचा फोटो सरकारला पाठवायचा आहे. जर तुमच्या फोटोची निवड झाली तर तुम्हाला 5000 रुपये मिळणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हे करा
– My Gov इंडियाने ट्विटरवर त्याची लिंक शेयर केली आहे. यावर तुम्ही फोटो शेअर करू शकता.
– तुम्हाला https://bit.ly/34h2CRT लिंकवर, अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल आणि या स्पर्धेच्या पर्यायात विनंती केलेली सर्व माहिती भरून सबमिट करावे लागेल. नंतर सरकारकडून बेस्ट एन्ट्रीची निवड केली जाईल. या स्पर्धेद्वारे दरमहा 10 प्रवेशिका निवडल्या जातील. अशा परिस्थितीत प्रवेश निवडीवर 5000 रुपये दिले जातील.