कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) घरात कोरोना व्हायरस टेस्टिंग करण्यासाठी कोविसेल्फ (Coviself) किटला मंजुरी दिली आहे. यामुळे आता कोणालाही घरी कोरोना चाचणी करता येणार आहे. 250 रुपयात घरच्या घरी रॅपिड अँटिजन टेस्ट किट आणून कोरोना चाचणी करता येईल. महत्त्वाचं म्हणजे अवघ्या 15 मिनिटात कोरोना चाचणीचा अहवाल हाती येणार आहे. पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन लिमिटेड कंपनीने घरच्या घरी रॅपिड अँटिजन टेस्ट किट तयार केलं आहे.

*या किटचा वापर कसा करावा, पाहा टिप्स

– नेझल स्वॅब दोन्ही नाकपुड्यांमध्ये 2 से 4 सेमी आतपर्यंत टाका.
– त्यानंतर नेझल स्वॅब दोन्ही नाकपुड्यांत पाच वेळा फिरवा.
– स्वॅब आधीपासून भरलेल्या ट्यूबमध्ये टाका आणि उरलेला स्वॅब तोडून टाका.
– ट्यूबचे झाकण बंद करा.
– टेस्ट कार्डवर ट्यूब दाबून एकामागून एक दोन थेंब टाका.
– चाचणी अहवालासाठी 15 मिनिटं वाट पाहा.
– 20 मिनिटांनंतर येणारा निकाल अवैध मानला जाईल.
टिप- टेस्ट कार्डवर दोन सेक्शन असतील. एक कंट्रोल, तर दुसरा टेस्ट सेक्शन. जर बार केवळ कंट्रोल सेक्शन ‘C’ वर असेल, तर कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे. जर बार कंट्रोल सेक्शन ‘C’ आणि स्ट सेक्शन ‘T’ या दोन्हीवर असेल, तर अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आहे.