आपल्या घरात सहज उपलब्ध होणार कॉर्न फ्लोअर अर्थात मक्याचे पीठ हे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? मक्याच्या पिठात व्हिटॅमिन सी, के ए आणि बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे भरपूर असतात. याशिवाय मक्याच्या पिठात लोह, फॉस्फरस, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाणही भरपूर असते. त्यामुळे आठवड्यातून काही दिवस तरी आपल्या आहारात मक्याचे पीठ असावे. काय आहेत त्याचे आपल्या शरीरासाठी फायदे, आपण जाणून घेणार आहोत.
कोलेस्ट्रॉल घटवणे :
मक्याच्या पिठाचा आहारात समावेश केल्याने आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी केली जाऊ शकते. या शिवाय शरीरातील अतिरिक्त चरबीही कमी केली जाऊ शकते. तसेच मक्याचे पीठ आहारात सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका ही घटतो.
बद्धकोष्ठता कमी करणे :
अनेकांना बद्धकोष्ठतेची समस्या असते, अशा व्यक्तींनी मक्याच्या पिठापासून तयार केलेल्या पदार्थांचे योग्य प्रमाणात सेवन करावे. पोटाच्या समस्यांचे कारण वयाचं शक्ती कमी असणे हे ठरू शकते. मक्याच्या पिठात भरपूर फायबर असते. बद्धकोष्ठतेची समस्या मक्याच्या पिठामुळे दूर होऊ शकते.
सतत भूक लागणे थांबते :
अनेकांना सतत भूक लागत असल्याने ते सतत खात असतात. मात्र असे केल्याने वजन वाढू लागते. अशावेळी सतत खाण्यापेक्षा एकदाच मक्याच्या पिठाचा समावेश असलेला पदार्थ खावा. त्यात कॅलरीजचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे तुम्हाला तुमचे पोट भरल्यासारखे वाटेल आणि सतत खायची इच्छा होणार नाही.
अशा प्रकारेही करता येईल सेवन :
मक्याचे पीठ दुधात शिजवूनही खाता येते. याशिवाय मक्याच्या पिठाचा पास्ता बनवूनही तुम्ही खाऊ शकता. स्वादिष्ट पास्ता करून तो मुलांनाही खायला घालता येईल.