मिठाचे प्रमाण योग्य असलं तर भाजी चवदार बनते. मात्र कधीकधी मिठाचे प्रमाण फसते. त्यासाठी जाणून घ्या भाजीत मिठाचे प्रमाण जास्त झाल्यास कोणते उपाय करावेत –

सुक्या भाजीत मीठ जास्त पडलं तर त्यात तुम्ही थोडंसं भाजलेलं बेसन किंवा दाण्याचं कूट घालू शकता.

पातळ/रस्सा भाजीत मीठ जास्त झालं त्यात थोडा उकडलेला बटाटा घालावा किंवा कणकेचा छोटा गोळा घालावा. यामुळे जास्त झालेलं मीठ शोषलं जाईल. थोड्यावेळाने कणकेचा गोळा किंवा बटाटा आठवणीने काढा.