उन्हाळ्यात मेथीचे सेवन कमी प्रमाणात करावे, कारण मेथी उष्णधर्मी आहे आणि शरीरातील उष्णता वाढवते. उन्हाळ्यामध्ये शरीरात आधीच उष्णता वाढलेली असते, त्यामुळे जास्त प्रमाणात मेथीचे सेवन केल्यास शरीरातील उष्णता आणखी वाढू शकते. यामुळे ताप, त्वचेवर पुरळ, घामोळ्या, पित्त वाढणे किंवा डिहायड्रेशनसारख्या समस्या उद्भवू शकतात.
हिवाळ्यात मेथीचे सेवन करणे लाभदायक आहे. कारण शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी, बॉडी टेम्परेचर स्थिर ठेवण्यासाठी मेथी उपयुक्त आहे.मेथी शरीरातील पचनप्रक्रिया सुधारण्यासाठी आणि रक्तशर्करा नियंत्रणासाठी उपयुक्त आहे, पण उन्हाळ्यात ती योग्य प्रमाणातच खावी, जेणेकरून शरीराचे तापमान नियंत्रित राहील.
मेथी उष्ण गुणधर्माची असते, म्हणूनच मेथी खाल्ल्यामुळे काही लोकांना ब्लिडींगचा त्रास सुद्धा होऊ शकतो.
मेथी जास्त खाल्ल्यामुळे अतिसाराचा त्रास होऊ शकतो.
मेथीमुळे शरीरातील उष्णता वाढत असल्याने गर्भवती स्त्रियांना मेथीचे अतिप्रमाणात सेवन करू नये. तसेच मेथी बीज जास्त खाल्ल्यास आंतरिक रक्तस्त्राव होऊ शकतो