नवी दिल्ली : गुजरातच्या सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेससाठी एक आणखीन मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना कालच दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली असताना आज राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवारी लोकसभा सचिवालयाकडून पत्र जारी करण्यात आले आहे.

काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून सूरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरविले असून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होणार का? याबाबत चर्चा सुरू झाली होती.

मोदी आडनावावरुन केलेल्या विधानप्रकरणी राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारची रद्द करण्यात आली. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा सचिवालयाने ही कारवाई केली असून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

राहुल गांधी हे केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, गुरुवार ( २३ मार्च) कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्यावर खासदारकी रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबत माहिती दिली आहे.