माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : अनेकांना चेहऱ्यावर डाग (reducing dark spots) येण्याची समस्या असते. हे डाग आले की घराबाहेर पडताना अनेकांना ओशाळल्यासारखे होते. मात्र, त्वचेची योग्य ती काळजी घेतल्यास असे डाग कमी होतात. त्यासाठी सकाळच्या वेळी कोवळ्या सुर्यप्रकाशात जाणे हा उपायही उत्तम. त्यासह घरगुती उपाय करूनही आपण हे डाग घालवू शकतो. काय आहे हा उपाय? तर तो आहे खोबरेल तेल आणि लवंग.. खोबरेल तेलांने आणि लवंगाने तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग कमी होऊ शकतात. कसे ते आपण पाहूयात. (Coconut oil)

हे ही वाचा ः डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

लवंग, खोबरेल तेलाचा असा करा वापर
लवंग थेट चेहऱ्यावर लावली जात नसल्याने लवंग खोबरेल तेलात मिसळतात किंवा लवंगाचे तेल खोबरेल तेलात मिसळून लावतात. चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी खोबऱ्याचे तेलात लवंग मिसळून त्याचे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. एक वाटी घेऊन त्यात 2 ते 4 थेंब लवंग तेल आणि एक चमचा खोबरेल तेल मिसळा. त्यात चिमूटभर हळदही टाका. हे तेल एकत्र करून चेहऱ्याच्या डागांवर लावा. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी हे मिश्रण सावधगिरीने वापरावे. थोड्या वेळाने तर चेहरा धुवा. लवंगमध्ये अँण्टीऑक्सिडेंट्स असतात. त्यात अँटीफंगल, अँटीमाइक्रोबियल आणि अँटीव्हायरल गुणधर्मही आहेत.

हे ही वाचा वजन कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक आहे अत्यंत गुणकारी

निस्तेज त्वचा
लवंगाचा वापर निस्तेज त्वचा करण्यासाठी केला जाऊ शकतो. कापसाच्या तुकड्यात खोबरेल आणि लवंग तेलाचे मिश्रण घ्या. आणि रात्री चेहऱ्यावर लावा. तुम्ही कोणत्याही क्रीम किंवा मॉइश्चरायझरमध्ये लवंगाचे तेल मिसळूनही लावू शकता. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवा.

कडुलिंबाचे तेलही फायदेशीर
कडुलिंबाचे तेलही चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरते. ते इतर कोणत्याही तेलात मिसळून लावता येते. याशिवाय तुम्ही काहीही न मिसळता फक्त खोबरेल तेल चेहऱ्यावर लावू शकता. कोरड्या त्वचेसाठी खोबरेल तेल फायदेशीर आहे. रात्री हे तेल लावून झोपा, दुसऱ्या दिवशी सकाळी चेहऱ्यावर ओलसरपणा जाणवेल.

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)