लवंगेमध्ये एनाल्जेसिक गुण असतात, त्यामुळे डोकेदुखी कमी होते.
डोकं दुखत असेल तर स्वच्छ रूमालात लवंगाची पूड ठेवून सुगंध घ्या. तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळेल.
लवंगेचे तेलही डोकेदुखीसाठी उपयुक्त ठरते. या तेलाचा वास घेतल्यास, डोकेदुखी कमी होते. तसेच लवंगाचं तेल आणि खोबरेल तेल एकत्र करून डोक्यावर मसाजही केल्यानेही डोकेदुखी कमी होते.
खोबरेल तेलामध्ये थोडे मीठ आणि ३-४ लवंग तेल मिसळून कपाळाला लावा. यामुळे डोकेदुखी लवकर थांबते.
डोकेदुखत असल्यास लवंग तेलात थोडे मीठ मिसळा आणि कपाळावर मालिश करा.