दालचिनीच्या औषधी गुणधर्मांमुळे दिवसातून एकदा तरी तुमच्या जेवणात दालचिनी असावी. जाणून घ्या दालचिनीचे आरोग्यवर्धक फायदे
रक्तदाब, ह्रदयविकारावर गुणकारी
दालचिनीमुळे शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत होतो.त्यामुळे रक्तदाब, ह्रदयविकार यांसारख्या समस्या दूर राहतात.
मधुमेह असणाऱ्यांसाठी फायदेशीर
शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे कामही दालचिनी करत असते.त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी दालचिनीचा आहारात समावेश करावा.
वजन नियंत्रणात राहते
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनी मदत करते. त्यासाठी दालचिनी पाण्यात उकळून गाळून त्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून प्या किंवा दालचिनीचा चहा प्यावा.
सांधेदुखीचा त्रास कमी होतो
सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी एक कप गरम पाण्यात दालचिनी पावडर आणि मध मिसळा. हे मिश्रण प्यायल्याने आराम मिळतो.
डोकेदुखी आणि अंगदुखीवर गुणकारी
दालचिनीमुळे डोकेदुखी आणि अंगदुखीदेखील कमी होण्यास मदत होते.
पोटाचे विकार
पोटदुखी आणि गॅसची समस्या असल्यास दालचिनी आणि मध एकत्र मिसळून खावे.