सध्या कोविड-19 चा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने आरोग्यदायी सवयींमध्ये आणि कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्लोरहेक्सीडीन माऊथवॉशचा समावेश करण्यात यावा, अशी विनंती आयसीपीएने सरकारकडे केली आहे. सरकारकडे हे दर्शविताना आयसीपीएने अनेक प्रकारच्या स्वतंत्र संशोधनाचा आणि अभ्यासांचा आधार घेतला आहे. क्लोरहेक्सीडीन माऊथवॉशच्या साह्याने चूळ भरल्याने किंवा गुळण्या केल्यास विषाणूंचे उच्चाटन तसेच घशातील संसर्ग कमी करण्यात मदत होणे शक्य असल्याचे या अभ्यासांत मांडण्यात आले आहे. आयसीपीएने सरकारला सुचवले आहे कि सुरक्षित अंतर राखणे, हाथाची स्वच्छता, मास्क घालणे आणि डोळ्यांची काळजी घेण्या बरोबर क्लोरहेक्सीडीन माउथवॉशचा वापर व्हायरसचे संक्रमण कमी करू शकतो.
“भारतात कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेत कोविडग्रस्त रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. समाजात लसीकरणास सुरुवात झाल्याने हर्ड इम्युनिटी विकसीत होण्यास चांगला पर्याय निर्माण झाला आहे जेणेकरून आता संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यास यश मिळेल. अर्थात, संपूर्ण लोकसंख्येला लस मिळण्यास थोडा वेळ जाणार आहे. मध्यंतरी तोपर्यंत त्वरित अशा उपाययोजनांची आवश्यकता आहे जे प्रसार रोखण्यास आणि संक्रमणाची तीव्रता कमी करण्यास मदत करतील. या महासाथीला रोखण्याकरिता आपल्याला किफायतशीर आणि प्रभावी इलाजाची गरज आहे. अनेक अभ्यासांनी असे सुचवले आहे कि क्लोरहेक्सीडीन माउथवॉशचा वापर सध्याच्या कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सरळ, सोपा आणि सुरक्षित असून हा पर्याय सहजसुलभ आणि सर्वत्र उपलब्ध असणारा आहे,” असे आयसीपीए हेल्थ प्रोडक्ट्स लिमिटेडच्या संचालिका आभा दमानी यांनी सांगितले.
“क्लोरहेक्सीडीन माऊथवॉशच्या वापराने लक्षणे असलेल्या आणि नसलेल्या व्यक्तीमुळे संभाव्य विषाणूचा संसर्ग कमी करण्यात मदत होते जेणेकरून समुदायात असलेला प्रादुर्भाव आटोक्यात येतो. तोंड-घशात झालेले संक्रमण वेळीच कमी केल्यामुळे रुग्णाचे आरोग्य खालावण्याचा धोका टळू शकतो. सध्या देशात शक्य ते प्रयत्न होणे आवश्यक आहे ज्यामुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय पायाभूत सुविधेवर येणारा ताण हलका होईल. क्लोरहेक्सीडीन माऊथवॉशचा समावेश प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये केल्याने विषाणू प्रसाराला आळा बसून विषाणू प्रादुर्भाव थांबण्यास मदत होईल. सरकार आमच्या शिफारशींचा विचार करून त्या लवकरात-लवकर अमलात आणेल असे आम्हाला वाटते,” असेही दमानी म्हणाल्या आहेत.
आयसीपीए हेल्थ प्रोडक्ट्स लिमिटेडचे टेक्निकल हेड (मार्केटींग) डॉ. राजीव चितगुप्पी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मार्च 2021 मधील जर्नल ऑफ मेडीकल वायरोलजीच्या नवीन अभ्यासात सध्याच्या समस्येवर प्रभावी उपाय मांडण्यात आला आहे. क्लोरहेक्सीडीन माऊथवॉशच्या वापराने ओरोफॅरिंजिअल मधील विषाणूंचा नाश शक्य आहे, असे अभ्यासातून स्पष्ट होते. क्लोरहेक्सीडीन चा एन्व्हलोपड विषाणूं वर होणारा अँटीव्हायरल परिणाम 1990 पासून ज्ञात आहे. नोव्हल कोरोनावायरस सार्स-कोव्ह-2 सुद्धा एन्व्हलोपड वायरस आहे. सार्स-कोव्ह-2 (SARS-CoV 2) एक अशक्त व्हायरस असल्यामुळे, ज्याचा एन्व्हलोप नष्ट झाल्यास त्याचे विषाणू निष्क्रिय होतात. एका भारतीय अभ्यासानुसार क्लोरहेक्सीडाईन डाइग्लूकोनेट चे 0.2 टक्के कॉन्सन्ट्रेशन सार्स-कोव्ह-2 चे विषाणू अवघ्या ३० सेकंदात क्रियारहित करतो. विषाणूच्या नव्या व्हेरिएन्टनुसार रुग्णसंख्येत खूप वेगाने वाढ होत असताना या अभ्यासाचे महत्त्व मोलाचे वाटते. क्लोरहेक्सीडाईन हे विषाणूच्या बाहेरील एन्व्हलोपवर आक्रमण करत असल्याने त्याची म्युटेशन आणि निरनिराळे व्हेरिएन्ट नष्ट करणे शक्य होते. तोंडात दीर्घकाळ राहून क्रियाशील असल्याशिवाय माउथवॉशचा काही उपयोग होत नाही. अगदी उत्तम दर्जाची विषाणू प्रतिरोधक क्षमता असणारे माऊथवॉश जर तोंडात दीर्घकाळ टिकून राहू शकले नाही तर त्याचा काही उपयोग नसतो कारण थुंकल्यानंतर काही मिनिटांतच लाळेच्या ग्रंथी आणि फुफ्फुसातून नवीन विषाणू तोंडामध्ये तयार होतात. कित्येक दशकांपासून आपल्याला माहित आहे कि क्लोरहेक्सीडीन तोंडात दीर्घकाळ टिकून क्रियाशील असते”
एप्रिल 2020 मधील लॅन्सेट जर्नल स्टडीने दर्शवले कि, क्लोरहेक्सीडीन चे केवळ 0.05 टक्के कॉन्सन्ट्रेशन सार्स-कोव्ह-2 ला (SARS-CoV-2) यशस्वीरित्या क्रियाहीन करायला मदद करतो. सध्या उपलब्ध असलेले 0.2 टक्के W/V कॉन्सन्ट्रेशन चे माऊथवॉश 0.05 टक्क्यांहून चार पटीने अधिक परिणामकारक आहे. क्लोरहेक्सीडीनची मुख्य शक्ती म्हणजे स्थिरता आहे जे ओरल टिशूज वर दीर्घकाळ राहते आणि तोंडात सतत क्रियाशील असते.
क्लोरहेक्सीडीन माऊथवॉशचे फायदे –
• एकदा क्लोरहेक्सीडीन माऊथवॉशने तोंड धुतल्यास सार्स-कोव्ह-2 (SARS-CoV-2) चा व्हायरल लोड तोंडात 2 तासासाठी कमी होतो जेणेकरून व्हायरल ट्रान्समिशन कमी करण्यात मदत होते
• 4 दिवसांसाठी क्लोरहेक्सीडीन माऊथवॉशच्या वापराने 62.1% वापरकर्त्यांमध्ये सार्स-कोव्ह-2 (SARS-CoV-2) चे ओरोफेरिंक्समधून समूळ उच्चाटन
• सध्याच्या कोविड-19 प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांमध्ये क्लोरहेक्सीडीन माऊथवॉशचा समावेश सुलभ आणि सुरक्षित
आयसीपीए हेल्थ प्रोडक्टस (आयसीपीए) विषयी –
आयसीपीए हेल्थ प्रोडक्टस लिमिटेड हा ओरल हेल्थकेअर सेगमेंटमधील अग्रगण्य भारतीय निर्माता आहे. थर्मोसील आणि हेक्सीडीन ही कंपनीची प्रसिद्ध आणि विश्वासार्ह उत्पादने आहेत. या 47 वर्षे जुन्या कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर साऊथ-ईस्ट एशिया, मिडल-ईस्ट, युनाइटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया आणि फ्रेंच वेस्ट आफ्रिकेत कंपनीचा व्यवसाय विस्तारलेला आहे. हेक्सीडीन माऊथवॉश अँटी-प्लाक, अँटी बॅक्टेरीयल म्हणून वापरले जाते. सार्स-कोव्ह-2 विषाणूला प्रतिबंध करून प्रादुर्भाव थांबवण्याकरिता याची शिफारस करण्यात आली आहे. डेंटल उत्पादनांशिवाय आयसीपीए द्वारे वनस्पतीयुक्त आणि सौंदर्यप्रसाधन उत्पादनांची निर्मिती त्यांच्या गुजरातमधील अतिशय अत्याधुनिक सुविधाकेंद्रात करण्यात येते. या सुविधाकेंद्राला ईयु, डब्ल्यूएचओ जीएमपी आणि आयएसओचे (EU, WHO GMP and ISO) प्रमाणपत्र प्राप्त आहे. भारतातील सुमारे 70 टक्के डेंटल सर्जनसह उपखंडातील कान-नाक-घसा व कर्करोग तज्ज्ञांनी आयसीपीएच्या फ्रेंचाईजी घेतल्या आहेत.