पुणे : आजकाल सोशल मीडियाचा वापर गुन्हेगारीसाठीही वाढला आहे. एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून सलग चार वर्षांपासून तरुणीचा वारंवार पाठलागकरून विनयभंग तसेच इन्स्टाग्राम आणि मोबाईलवर मॅसेजकरून त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, या तरुणीला दुसऱ्याशी लग्न केल्यास त्याला मारण्याची धमकी दिली आहे.
याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, एका तरुणावर गुन्हा नोंद केला आहे. २०१८ ते मार्च २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी व आरोपी ओळखतात. तो २०१८ पासून तिचा पाठलाग करत होता. पण, तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला होता. तरीही तो इन्स्टाग्रामवर मॅसेज करत असे. तसेच, तुझ्याशी लग्न करायचे आहे असे सांगत तरुणीला दुसऱ्याशी लग्न केले तर त्याला मी मारेल अशी धमकीही दिली. त्यानंतर या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.