सध्याच्या काळात अनेकांना एका समस्येला सामोरं जावं लागतं ती म्हणजे केसांची गळती, अकाली टक्कल पडणे. या समस्येमुळे अनेक जण त्रस्त आहेत. परंतु ही समस्या कशामुळे होते, याची कारणे जाणून घेऊयात.

अकाली टक्कल येणं म्हणजे काय?
केस गळती, केसांत कोंडा होणे, टक्कल पडणे या समस्या अनेक तरूण वयातील मुलांना जाणवतात. खूप कमी वयातच डोक्यावर टक्कल पडू लागते आणि डोक्यावरील भाग गुळगुळीत होऊन त्या जागेवर नव्याने केस उगवणे थांबून जाते या स्थितीला अकाली टक्कल पडणे असे म्हणतात.

अकाली टक्कल पडण्याची कारणे-

  • चुकीचा आहार घेतल्याने असं होऊ शकतं
  • असंतुलित जीवनशैली
  • कमी झोप घेतल्यानेही ही समस्या उद्भवते
  • पोषक तत्वांची कमतरता
  • तणाव ग्रस्त जीवनशैली
  • आनुवंशिकता

काय काळजी घ्यावी
अतिशय गरम पाण्याने केस धुणे टाळावे.
सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळी आपण केस धुतो तेव्हा बोअरवेलचे पाणी वापरू नका.
संतुलित आणि सकस आहार घेतला पाहिजे.
जास्तीत जास्त झोप घेणेही गरजेचे आहे.
ताण तणावापासून लांब राहा.
दररोज व्यायाम, योगासने करा.

सकाळी उठल्यावर प्रथम ‘ही’ कामे कराच !

रिकाम्या पोटी ‘कडुलिंबा’ची पाने खाल्यास होणारे फायदे