डायबिटीज हा एक गंभीर आजार आहे. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण असंतुलित होते तेव्हा डायबिटीज होतो. डायबिटीजची कारणं ही व्यक्ती आणि आजाराच्या प्रकारानुसार बदलतात. जाणून घ्या डायबिटीजचे प्रकार आणि कारणे –
डायबिटीजचे प्रकार
डायबिटीज टाइप -1, (Diabetes type -1),
डायबिटीज टाइप -2 (Diabetes type -2)
महिलांच्या गर्भधारणा कालावधीतील डायबिटीज (Gestational Diabetes)
टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज हे दीर्घकालीन डायबिटीजचे प्रकार आहेत. तिसरा प्रकार म्हणजे गेजेस्टेशनल डायबिटीज म्हणजे गर्भावस्थेतील डायबिटीज होय. हा डायबिटीज बरा होऊ शकतो.
जाणून घ्या डायबिटीज होण्याची कारणे
चुकीचा आहार
कॅलरी, फॅट्सआणि कोलेस्टेरॉल जास्त असलेल्या आहारामुळे शरीर इन्सुलिनला प्रतिरोध करू लागते आणि म्हणून डायबिटीज धोका वाढतो.
अनुवांशिकता
डायबिटीज हा अनुवांशिकतेमुळे होऊ शकतो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा आई-वडिलांना डायबिटीज असेल तर तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाण्याची शक्यता असते.
लठ्ठपणा
शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे शरीर इन्सुलिनचा प्रतिकार करू शकते. फॅटी टिश्यूमुळे सूज येऊ शकते ज्यामुळे इन्सुलिनचा प्रतिकार होऊ शकतो. त्यामुळे डायबिटीज होण्याची शक्यता वाढते.
नाश्ता न करणे
नाश्ता न करणे हे देखील डायबिटीज मोठे कारण आहे. सकाळी नाश्ता न केल्याने शरीरातील इन्सुलिनचे संतुलन बिघडते, ज्यामुळे डायबिटीजची शक्यता वाढते.
व्यायाम न करणे
व्यायामामुळे स्नायूंच्या ऊती इन्सुलिनला चांगला प्रतिसाद देतात. परंतु अजिबातच व्यायाम नसेल तर त्यामुळे डायबिटीजचा धोका वाढतो.
सूर्यप्रकाशाचा अभाव
कोवळ्या उन्हातून शरीराला व्हिटॅमिन डी मिळते . व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या लोकांना डायबिटीजचा धोका सर्वाधिक असतो.
रिफायन्ड कार्बोहायड्रेट्सचे सेवन
पांढरा ब्रेड, पांढरा तांदूळ, मैदा किंवा इतर कार्बोहायड्रेट्समुळे शरीरात जास्त इंसुलिन तयार होते. यामुळे, लवकरच भूक लागते. यामुळे डायबिटीज होण्याची शक्यता वाढते.
चुकीच्या सवयी
रात्री उशिरापर्यंत जागे राहणे, कमी झोपणे, न खाणे, सिगारेट ओढणे आणि मद्यपान करणे यासारख्या चुकीच्या सवयींमुळे डायबिटीज होतो. यामुळे शरीरात ट्रायग्लिसरायड्स वाढतात, ज्यामुळे डायबिटीज होण्याचा धोका असतो.
अतिशय कमी पाणी पिणे
पाण्याअभावी शरीर हायड्रेट होत नाही आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते. यामुळे डायबिटीजचा धोका वाढतो.
रक्तदाबाच्या त्रासावर ‘हे’ आसन गुणकारी, जाणून घ्या आसन करण्याची पद्धत आणि इतर फायदे