रांजणवाडी म्हणजे काय? (What is a Stye (Ranjanwadi)?
डोळयांच्या पापणीला आतल्या बाजूला, कडेला आलेला फोड म्हणजे रांजणवाडी. रांजणवाडी हा फार गंभीर आजार नसला तरी यामुळे डोळ्यांना काहीकाळ त्रास होतो. शक्यतो उन्हाळ्यात रांजणवाडी येण्याचे प्रमाण अधिक असते. ही रांजणवाडी कधी दुखणारी, न दुखणारीही असू शकते. काहींना रांजणवाडी आल्यावर ती पुन्हा-पुन्हा येते.
रांजणवाडी येण्याची कारणे (Causes of a Stye)
प्रदूषण, डोळे कोरडे पडल्याने, डोळयांची योग्य स्वछता न राखल्याने, उष्णतेमुळे, पोट साफ न होणे किंवा अपचन, अतिजागरण यांसारख्या कारणांमुळे डोळ्याला रांजणवाडी येते.
रांजणवाडीवर घरगुती उपाय (Home Remedies for Stye (Ranjanwadi))
1) मातीचा भुगा किंवा तांब्याचे नाणे (Clay Powder or Copper Coin)
खापराचा माठ किंवा रांजणाच्या मातीचा थोडा बारीक भुगा करून तो रांजणवाडीवर लावावा. किंवा तांब्याचे नाणे रांजणावर घासून रांजणवाडीवर लावावे.
2) बटाट्याचा रस (Potato Juice)
बटाट्याचा रस काढून रांजणवाडी वर लावावा. यामुळे रांजणवाडीचा फोड कमी होतो शिवाय त्याचे डागही डोळ्याच्या त्वचेवर राहत नाही.
3) पेरूची पाने (Guava Leaves Paste)
पेरूची पाने बारीक करून त्याची पेस्ट बनवून रांजणवाडीवर लावा. हा उपाय दिवसातून एकदा करावा.
4) कोरफडीचा गर (Aloe Vera Pulp)
कोरफडीचा गर रांजणवाडीवर लावावा.
5) हळदीची पेस्ट (Turmeric Paste)
हळदीची पेस्ट बनवून कापडाच्या सहाय्याने रांजणवाडीवर लावावी.
6) तूप (Ghee)
घरी बनवलेले तूप गरम करून कापसाच्या बोळ्याच्या मदतीने रांजणवाडीवर लावा.
( टीप : दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या. )