• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home तज्ञांचे मार्गदर्शन

तुमची झोप पूर्ण होत नाही?‘या’ पाच सवयींमुळे बिघडते तुमचे चयापचय, जाणून घ्या…

Maz Arogya by Maz Arogya
February 29, 2024
in तज्ञांचे मार्गदर्शन
0
complex biochemical process
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रोजची धकाधकीची दिनचर्या (Routine)  कामाचा ताण त्यामुळे अनेकजण आपल्या तब्बेतीकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. व्यस्त जिवणशैलीमुळे जेवणाकडे होणाऱ्या दुर्लक्षाणुळे अनेक समस्याना निर्माण होतात. यामध्ये प्रामुख्याने चयापचय प्रक्रिया (metabolic process) बिघडते. चयापचय हे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि एकूण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ही एक गुंतागुंतीची जैवरासायनिक प्रक्रिया (complex biochemical process ) आहे, ज्यामध्ये तुम्ही जे अन्न खाता आणि पेय पिता त्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर होते. पण, जीवनशैलीतील विविध घटक आणि सवयी या नाजूक संतुलनामध्ये अडथळे निर्माण करू शकतात, ज्यामुळे तुमची चयापचय प्रक्रिया बिघडू शकते.

सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता (Lack of sun exposure)
मानवी शरीर व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशावर अवलंबून असते. व्हिटॅमिन डी हे चयापचय कार्यात एक महत्त्वपूर्ण घटक आहे. “पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यास आपल्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता होते, ज्यामुळे शरीराची ऊर्जा निर्माण करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.तसेच, पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यास शरीराचे सर्कॅडियन लय म्हणजेच जैविक चक्रमध्ये (झोपण्याची -उठण्याची वेळ) यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, जे मेलाटोनिन आणि सेरोटोनिनसारख्या चयापचय-नियमन हार्मोन्सवर परिणाम करते”, असेही खोसला यांनी स्पष्ट केले.

जंक फूड (High intake of junk food)
खोसला यांच्या मते, प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये भरपूर साखर, आरोग्यासाठी धोकादायक फॅट्स आणि कृत्रिम पदार्थ असतात जे चयापचय प्रक्रिया बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. अशा पदार्थांमधील कॅलरीचे पोषण मूल्य कमी असते. अशा पोषक मूल्य कमी असलेल्या कॅलरीजच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि कालांतराने इन्सुलिन रेझिस्टन्स आणि चयापचय कार्य बिघडू शकते.”

ताण-तणाव (Stress)
खोसला यांनी सांगितले की, “दीर्घकालीन ताण-तणावामुळे आपल्या शरीरातील प्राथमिक स्ट्रेस हार्मोन्स कोर्टिसोलच्या उत्सर्जनास चालना मिळते. उच्च कॉर्टिसोल पातळीमुळे भूक वाढू शकते, उच्च-कॅलरी पदार्थांची लालसा आणि अतिरिक्त फॅट्स साचणे या सर्व गोष्टी चयापचय संतुलनात व्यत्यय आणतात.”

झोप पूर्ण न होणे (Poor sleep)
खोसला यांच्या मते, चयापचय उत्तम प्रकारे कार्य करण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते, कारण ते लेप्टिन आणि घेरलीन (Leptin and ghrelin) सारखे हार्मोन्सचे नियंत्रण करते. झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोलसारख्या हार्मोन्सचे असंतुलन निर्माण होते, जे चयापचय क्रियेत अडथळा निर्माण करते आणि लठ्ठपणा आणि मधुमेह होण्याचा धोका वाढवते.

रात्रीच्या वेळी फोन वापरणे (Exposure to blue light at night)
सतत फोन आणि लॅपटॉप वापरण्याच्या आपल्या सवयीमुळे आपण नेहमी ब्ल्यू लाईटच्या संपर्कात येतो, जे शरीराच्या नैसर्गिक जैविक चक्रामध्ये अडथळा निर्माण करते. या अडथळ्यामुळे आपल्या झोपेवर आणि चयापचय प्रक्रियेवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे वजन वाढणे आणि चयापचयाचे विकार होऊ शकतात, असेही खोसला यांनी सांगितले आहे.

आपल्या चयापचयाशी संबंधित इतर सामान्य चुकांबाबत सांगताना पालघर येथील लाइफलाइन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लागार फिजिशियन, अधिकारी, डॉ. दीपक पाताडे यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती देताना सांगितले की, क्रॅश डाएट किंवा दररोज सामान्य किंवा सवयीपेक्षा कमी कॅलरीजचे सेवन करणे, जेवण न करणे, विशेषत: नाश्ता, कॅफीन किंवा एनर्जी ड्रिंक्सवर अत्याधिक अवलंबून राहणे आणि शरीरातील पाण्याच्या पातळीकडे दुर्लक्ष केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडू शकते आणि एकूण ऊर्जा पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे दैनंदिन कामकाजात अडथळा येतो.

” रोजच्या जीवनशैलीतील या अडचणी टाळून आणि पोषण, व्यायाम, झोप आणि तणाव व्यवस्थापन याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. हा संतुलित दृष्टीकोन स्वीकारल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते आणि त्याची चयापचय प्रक्रिया अधिक चांगली होते”, असा त्यांनी निष्कर्ष काढला.

Previous Post

Menopause : मेनोपॉजपूर्वी शरीरात दिसतात ‘ही’ 5 लक्षणे; महिलांनी करू नये दुर्लक्ष

Next Post

Cholesterol : मधुमेहामुळे वाढू शकते कोलेस्टेरॉलची पातळी? ‘असे’ ठेवा नियंत्रण

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
Does Diabetes Cause High Cholesterol

Cholesterol : मधुमेहामुळे वाढू शकते कोलेस्टेरॉलची पातळी? 'असे' ठेवा नियंत्रण

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

2 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

2 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

उन्हाळी लागल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या उन्हाळी लागण्याची कारणे आणि लक्षणे

2 years ago
घरच्या घरी मेनिक्युअर करून हातांना बनवा मुलायम आणि सुंदर

घरच्या घरी मेनिक्युअर करून हातांना बनवा मुलायम आणि सुंदर

3 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

2 months ago

उन्हाळी लागल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या उन्हाळी लागण्याची कारणे आणि लक्षणे

2 years ago
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

2 months ago
शंकराला प्रिय असणारे बेलपत्र आहे खूप आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे

उपाशीपोटी बेलपत्र खाण्याचे फायदे

3 months ago
गोकर्णीच्या फुलांचे ‘हे’ उपयोग तुम्हाला माहित आहेत का ?

गोकर्णीच्या फुलांचे ‘हे’ उपयोग तुम्हाला माहित आहेत का ?

10 months ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.